जळगांव जामोद शहरात भव्य भगवा ध्वज मोटारसायकल रॅली संपन्न हमारे श्रीरामलला पधार रहे है

0
236

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

जळगांव जामोद शहरात भव्य भगवा ध्वज मोटारसायकल रॅली संपन्न
हमारे श्रीरामलला पधार रहे है

तमाम हिंदू बांधवांकरिता आनंदाचा क्षण म्हणजे श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे श्रीरामलला यांची होणारी प्राणप्रतिष्ठा.

प्रभु श्रीरामलला  यांची होणारी प्राणप्रतिष्ठा ही विश्व रेकॉर्ड असेल श्रीरामलला यांचे आगमन थाटात व्हावे हा संदेश रॅलीच्या माध्यमातून दिला.

सकल हिंदू समाज मिळून ही भव्य भगवा ध्वज मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमधे सुमारे 1000 मोटारसायकली होत्या सर्व हिंदू बांधवांनी जात, पात, पक्ष विसरून रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ही रॅली संत तुकाराम चौक येथून जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की जय, सियावर रामचंद्र की जय अशाप्रकारे जयघोष करत सुरु करण्यात आली समोर ती बस स्टॅन्ड, तहसील चौक, दुर्गा चौक, चौभारा चौक, मानाजी चौक, जुना भाजी बाजार, बालाजी गल्ली,चावडी, स्टेट बँक समोरून, दुर्गा चौक येथे महाआरती करून फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये मोठ्या थाटामध्ये संपन्न झाली.

या रॅली त आ. डॉ. श्री संजयजी कुटे साहेब यांनी पूर्णवेळ हजेरी लावली तर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री सचिन बाप्पू देशमुख हे सुध्दा उपस्थित होते.

या रॅलीचे आयोजन श्री अजय वंडाळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली. रॅली तर यशस्वी करण्याकरिता भाजपा शहर अध्यक्ष कैलास पाटील,श्री राजेंद्र सारसर, व्ही एच पी शहर अध्यक्ष ॲड विजय धर्मे, बजरंग दल नगर संयोजक रितेश डोबे, भाजयुमोर्चा शहर अध्यक्ष उमेश येऊल, रमेश कोथळकर, परम राजपूत, गिरीश काळे, शिवसेनेचे विशाल पाटील, शुभम चंडाले, शिवसेनेचे गोपाल ढगे, अनिल ढोकणे, सुरज कोथळकर, रोहन वानखडे, गोपाल दामोदर, सागर अग्रवाल, दिगंबर हिवरकर, आनंद वानखडे वैभव जाधव, अमोल भगत इत्यादी असंख्य कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here