
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
आज आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, ज्या
राममंदिराकरिता संघर्ष व राममंदिर निर्माण आणि रामललाची भव्य- दिव्य मंदिरातील प्राणप्रतिष्ठा याची देही याची डोळा आज आपण पाहत आहोत, यापेक्षा दुसरे कोणते भाग्य असू शकत नाही.
हे सर्व त्या कारसेवकांच्या संघर्षाचे फलित आहे, असे गौरवोद्गार कारसेवकांच्या गौरव सोहळयात आमदार डॉ.संजय कुटे यांनी काढले.
21 जानेवारी रोजी संस्कृतिक भवनात सकाळी १० वा. कारसेवकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन कारसेवक गौरव समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयम सेवक बाल किसन बंनातवाले होते ज्यांच्या हस्ते कारसेवकांचा गौरव झाला. कारसेवक यांचा सत्कार करताना जळगाव जा मतदारसंघाचे आमदारडॉ. संजय कुटे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. कुटे म्हणाले की एक सक्षम भव्य-दिव्य समर्थशाली, वैभवशाली भारताच्या निर्मितीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आपण प्रत्येकाने संकल्प करावा. कारसेवकांच्या संघर्षातून,
बलिदानातून निर्माण झालेल्या राममंदिरचा आजचा हा क्षण कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचलन अंबरीश पुंडलिक यांनी केले. तालुक्यातील कारसेवकांच्या प्रवासावर प्रकाश टाकला व सर्वांचे आभार व्यक्त केले.
तसेच या कार्यक्रमात एकूण 200 कारसेवकांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. जे दिवंगत होते, त्यांच्या परिवाराला गौरविण्यात आले. यावेळी डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते कारसेवकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच कारसेवकांच्या परिवारातील महिलांना पूजेचे साहित्य ताह्मण, देव्हाऱ्यातील घंटा, पळी, दिवा असे साहित्य भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळेस डॉ संजय कुटे,डॉ सौ अपर्णा कुटे, अभिषेक कुटे, व बाल किसन बंनातवाले यांच्या हस्ते कारसेवकांच्या पत्नींचा, घरच्या महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता ही स्नेह भोजनाने झाली













