कोल्हटकर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व युवोत्सव 2024 चे आयोजन

0
84

 

जळगांव जामोद (प्रतिनिधी):-

स्थानिक
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व युवोत्सव 2024 चे आयोजन दिनांक 23 ,24, व 25जानेवारी 2024 रोजी करण्यात आले, 23/01/2024 रोजी प्रा.डॉ सूरज शुक्ला मलकापूर यांनी नविन शैक्षणिक धोरण या विषाया अन्तर्गत कार्यशाळेमधे मार्गदर्शन केले. यानंतर लगेच दिनांक 23/1 /2024 मंगळवार रोजी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन युवोत्सव 2024 चे उद्घाटन जळगाव शिक्षण मंडळ जळगाव जामोद चे अध्यक्ष अनिलजी जयस्वाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोबतच मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रवीण डाबरे प्रभारी प्राचार्य तसेच जळगाव शिक्षण मंडळ जळगाव चे सचिव अनुप पुराणिक, सहसचिव मिलिंद जोशी, प्रा. गिरीश कुलकर्णी सांस्कृतिक विभाग प्रमुख वरिष्ठ महाविद्यालय, प्रा.जी.एस.वानखेडे पर्यवेक्षक, प्रा. राजीव देवकर सांस्कृतीक विभाग प्रमुख कनिष्ठ महाविद्यालय, अधीक्षक संजय गाडेकर, प्रा. प्रकाश गवई, प्रा. डॉ. निलेश निंबाळकर, प्रा. प्रदीप चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती, जळगाव शिक्षण मंडळ जळगाव जामोद चे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली ,तसेच सर्व मान्यवरांनी सुद्धा सरस्वती पूजन केले. कु. निकिता घुळे या विद्यार्थिनीने सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर केले. यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत इ स्वागतानंतर प्रास्ताविक प्राध्यापक गिरीश कुलकणी व प्राध्यापक राजीव देवकर यांनी केले, अनिल जयस्वाल अध्यक्ष ज शि.मं यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन केले, संस्थेचे सचिव अनुप पुराणिक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले, सहसचिव मिलिंद जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले, आधिक्षक संजय गाडेकर यांनी आपले विचार मांडले. दिनांक 23, 24 व25 जानेवारी 2024 रोजी 3 दिवस कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, नाटिका, म्युझिकल ड्रामा, एकपात्री प्रयोग, मूक अभिनय, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या सर्व कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देत जवळपास 70 वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले ,विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडुन वाहत होता, आणि दर्शक म्हणून उपस्थित असलेले विद्यार्थी टाळ्या वाजवून जल्लोष करीत होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रदीप चव्हाण , आणि प्रा. राजीव देवकर सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी तसेच प्रा. गणेश जोशी यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे संचालन प्रा. रामेश्वर सायखेडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. गणेश जोशी यांनी केले. सांस्कृतीक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून प्रा. प्रकाश गवई, प्रा.सौ. अर्चना जोशी, प्रा. वसंत चव्हान व प्रा. डॉ. गोपाल भड , यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. डाबरे,प्रा. डॉ. विप्रदास, प्रा ऋषिकेश कांडलकर, प्रा. झोपे, प्रा. विनोद बावस्कर, प्रा. आकाश निलजे, प्रा. निलिमा भोपळे, प्रा. भाग्यश्री जाणे, प्रा. रामेश्वर सायखेडे , प्रा.फाळके सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू, भगिनी, आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here