
जळगाव जामोद:- प्रतिनिधी
तालुक्यातील जळगाव जामोद ते नांदुरा रोड वरील खांडवी बस थांब्याजवळ दोन वाहनात प्रत्येकी चार-चार गुरे वाहून नेताना मिळून आल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला
प्रत्येक वेळी सामान्य माणूसच गुरे पकडुन देतात ह्या बाबत शासकीय यंत्रनेनी लक्ष देण्याची गरज आहे अशी चर्चा नागरिक करीत आहे
सविस्तर दिनांक 6/ 4/ 2024 च्या दुपारी 12:30 च्या दरम्यान दोन बोलेरो मालवाहू एमएच २९ बीई 33 07
एम एच 19 सी वाय 2032 या वाहनांमध्ये प्रत्येकी चार गोवंश गोरे नेतांना जळगाव ते नांदुरा रोडवरील खांडवी बस स्थानकाजवळ रोशन बावस्कर मयूर वानखडे यांना जळगाव जामोद हून फोन वर गिरीश काळे व सूरज कोथळकार यांनी माहिती दिली त्यानुसार त्या दोन्ही मालवाहू गाड्या थांबवून पाहिले असता त्यात प्रत्येकी 4 गोऱ्हे
दिसून आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केल्याने वाहन चालक आरोपी गणेश महादेव भगत राहणार लोणवाडी ता नांदुरा शेख यासीन शेख हुंमान राहणार नांदुरा यांना पोलीस येई पर्यंत थांबून ठेऊन नंतर
पो उ नी अमोल पंडित यांच्या तक्रारीवरून अप नंबर 217/2 4 कलम 11 (1) ध ड च (प्राणी निर्देशेने वाहतूक) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे यावेळी खांडवी येथे गिरीश काळे बजरंग दल संयोजक
सुरेश कोथळकर सह संयोजक
ज्ञानेश्वर कोथळकर, विनोद अबडकर, अजय गावंडे ऋत्विक भगत, ॲड विजय धर्मे, ॲड शशिकांत गुप्ता हे उपस्थीत होते













