
दुर्गा चौकात लावलेली दुर्गा देवीची प्रतिमा,अज्ञात व्यक्ती च्या सांगण्यावरून काढल्यामुळे..हिंदू धर्मियांचा आक्रमक पवित्रा
जळगाव जामोद :- प्रतिनिधी
येथील दुर्गा चौकामध्ये सुशोभीकरणाचे काम चालू असून ह्या चौकातील बुरुजावर दुर्गा देवीची प्रतिमा, लावण्यात आली होती, ती अज्ञात समाजकंटकाने काढून धार्मिकतेशी छेडछाड करून भावना दुखावल्यामुळे त्याबाबत तात्काळ चौकशी होऊन अज्ञात धर्मांध व्यक्तीच्या सांगण्यावरून प्रशासनाने ती प्रतिमा काढली अशी चर्चा जनतेमध्ये आहे
तरी सदरहू व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, व आजच्या आज त्या ठिकाणी दुर्गा देवीची प्रतिमा स्थापित करावी, अन्यथा सकल हिंदू धर्मियांतर्फे ह्या कृत्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा…उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे
निवेदनावर अजय प्रल्हाद वंडाळे, नितीन अरुण काळे, आशिष राजेंद्र सारसर
यांच्यासह बऱ्याच जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ह्या चौकात 50 ते 55 वर्षा पासुन नवरात्री मध्ये दुर्गा देवी बसत असते तेव्हा पासून त्या चौकाचे नाव दुर्गा चौक असे पडले आहे त्या मुळे न प च्या
टेंडर मध्ये दुर्गा देवी ची प्रतिमा समाविष्ट कऱण्यात आली आहे सदर टेंडर ला जिल्हाधकारी यांची मान्यता आहे.













