सरकारी जमीनचे प्लॉट खोटे दस्त केल्या प्रकरणी दुय्यम निबंधक वर कार्यवाही करा 

0
59

सरकारी जमीनचे प्लॉट खोटे दस्त केल्या प्रकरणी दुय्यम निबंधक वर कार्यवाही करा 

 

जळगांव जा.अमोल भगत प्रतिनिधी

 

स. पं. चव्हाण दुय्यम निबंधक जळगांव जा. यांनी शासकीय जमीन विनापरवानगी प्लॉट आर्थिक स्वार्थासाठी दस्त करुन दिल्या प्रकरणी चौकशी व कार्यवाही ची मागणी जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडे तक्रार व्दारे देविदास तायडे यांनी मागणी केली

 

जळगांव जा. मौजे वायाळ शिवारातील शासकीय जमीनीची महसूल अधिकारी यांची कृषकची अकृषक परवानगी नसतांना, ग्रामपंचायत नमुना आठ नोंदी नसतांना रफिक शाह रहेमान शाह रा.जळगांव जा. यांनी प्लॉटचे नमुने आठ तयार करून दुय्यम निबंधक चव्हाण यांनी ९ते १० प्लॉट दस्तऐवज करुन दिले. दस्त करतांना प्लॉट परवानगी, नकाशा, सातबारा, महसूल अधिकारी परवानगी, सक्षम अधिकारी नाहरकत प्रमाणपत्र, मिळकत प्रमाणपत्र, फेरफार आदी कागदपत्रे दस्त करतांना पुरावे लागतात असे नियमाच्या पत्राला धरुन एकही कागदपत्र दस्त ऐवजाला दिसत नाही. दस्तऐवजला बनावट नमुना आठ व घेनार देनार आधारकार्डच्या दोन प्रती दिसून येतात. तर नमुना आठ व शपथेवर निवेदन करुन दिलेले पत्र या दोन कागदावर दस्त ऐवज दुय्यम निबंधक यांनी करुन दिले. दस्त अवलोकन केले असता यामध्ये दस्तुर (वायंडर) हे सुध्दा विनापरवानगी दस्त तयार करतात. ग्रामपंचायत रसूलपूर ग्रामसेवक व सरपंच यांनी रफिक शाह रहेमान शाह यांच्या नावे नमुना आठ ला कोणत्याही नोंदी नाहीत. मौजे वायाळ येथील निमखेडी फाट्या जवळ शेती मध्ये अकृषक न कताच प्लॉट पाडून परस्पर विक्री केली. त्याची ग्रामपंचायत उपलब्ध रेकॉर्ड मध्ये नोंदी नाही, असे लेखी देण्यात आले. सदर जमीन शासकीय असून उदरनिर्वाह करण्यासाठी सिताबाई रामदास जाधव या लाभार्थी महीलेला शासनाने अटी व शर्ती लावून जमीन दिले होते. त्याजमीनवर प्लॉट पाडून विक्री कराणारा रफीक शाह रहेमान शाह हा मुळ मालक आहे किंवा नाही हे दुय्यम निबंधक यांनी शहानिशा न करता दस्त करुन दिले. नियमानुसार दस्ताल लागणारे कागदपत्र दस्ताला नसुन चव्हाण यांनी सुध्दा शासनाची दिशाभूल केली.

 

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन, संबंधीत दुय्यम निबंधक अधिकारी चव्हान यांच्यावर कार्यवाही करावी. दुय्यम निबंधक यांनी करुन दिलेले दस्त हे रद्द करावे अशी तक्रार व्दारे मुख्यमंत्री, महसूल मंत्री,विरोधी पक्षनेता, जिल्हा अधिकारी, जिल्हा निबंधक जिल्हा अधिकारी उपविभागीय अधिकारी जळगांव जा यांना प्रती देवुन मागणी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here