
सरकार सेवा केंद्र व सी एस सी चालकांचा विविध मागण्यांसाठी एक दिवस संप पुकारला
जळगांव जा. प्रतिनिधी
तालुक्यातील सर्व सीएससी केंद्र चालक-मालक यांनी एक दिवस संप असून संघटनेचे अध्यक्ष दिपक म्हसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते मा.उपविभागिय अधिकारी जळगांव जा, मा.तहसिलदार जळगांव जा, मा. कृषी अधिकारी जळगांव जा. व स्थानिक मा. ना. माजी मंत्री विद्यमान आमदार डॉ. संजयजी कुटे यांचे कार्यालय यांच्यामार्फत शासनास निवेदन सादर करण्यात आले त्यात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नागरिकांच्या सेवेत असून महाराष्ट्र शासनाने सी एस सी अंतर्गत खरीप व रब्बी पीक विमा नोंदनी संबधित निर्देशित केले आहे की पिक विमा नोंदणी मात्र 1 रुपया मधे शासन देणार असून त्यापोटी सी एस सी चालकांना 40 रुपये एवढी रक्कम शासनाने सी एस सी चालकांना देण्याचे सांगितले होते. परंतु आजपर्यंत कोणत्याही सी एस सी चालकांना 5 ते 15 रुपया पर्यंत प्रती विमा पावती मिळालेले आहे. तरी सुद्धा शासनाने पिक विमा नोंदणी शुल्कात वाढ करून प्रती सातबारा 100 रुपये या प्रमाणे कमिशन देण्यात यावे. जेणे करून शेतकऱ्याकडून अतिरिक्त शुल्क मागण्याची गरज पडणार नाही.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सी एस सी मार्फत देण्यात येऊन त्यापोटी प्रती अर्ज रू.100/- शासनाकडून कमिशन तत्काळ जमा करण्यात यावे तसेच सेतू मधील सर्व सुविधा हे सी एस सी पोर्टल मधून सुरू करण्यात यावे ज्यामुळे शासकीय कामे वेळेत पूर्ण होतील तसेच सी एस सी व्ही एल ई चालकांना प्रतिमाह कमीत कमी 20000 रू मानधन देण्यात यावे . व काही जिल्यात ज्या चालकांवर गुन्हे दाखल झाले आहे ते तत्काळ मागे घेण्यात यावे
यासारख्या अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत, मागण्या मान्य न झाल्यास पुढील काही दिवसांत बेमुदत उपोषण करणारं असल्याचा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे, त्या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण कोथळकार , कोषाध्यक्ष अमरसिंग राजपूत, सचिव राजेश काचकुरे , प्रसिध्दी प्रमुख गजानन हिस्सल , श्याम क्षीरसागर, अरुण वानखडे, विशाल तळे , विशाल सपकाळ , विजय अवसरमोल , अक्षय पाटील , प्रसाद महाले , आकाश फाळके, भुनेश्वर पारस्कर शेहबाज खान
व जळगांव जा. मधील सर्व सी एस सी व्ही एल ई उपस्थित होते.













