
“खून का बदला खून” अशी सिने स्टाईल इसमाची हत्या”
जळगाव जामोद (प्रतिनिधी) :-
पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम सुनगांव येथे दिनांक 10 नोव्हेबंर रोजी 52 वर्षिय इसमाचा खून’ झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती,
सुनगांवातील राहीवाशी असलेले मोतीराम मारोती धूळे यांचा दीनांक 9 नोव्हेबंर रोजी प्रल्हाद रघुनाथ बोदडे यांच्या गावाजवळ असलेल्या रोड लगत च्या घराच्या पाठीमागील मोकळ्या रस्त्याने जात असलेल्या नागरीकाना मृतदेह दिसुन आला, येथील नागरीकानी ह्या घटनेची माहीती पोलीस पाटलांना दिली व पोलीस पाटलांनी तातडीने जळगांव जामोद पोलीसानां याबाबत कळवीले, पोलीसानीं घटनास्थळी जाउन पंचनामा केला असता मृतक” मोतीराम मारोती धुळे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार केलेले आढळले, यावेळी पोलीसांनी काही वेळातच आरोपीचा शोध घेउन आरोपीस अटक केली,
यावेळी आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली, आरोपीचे नाव शेषराव सखाराम दामधर, राहनार सुनगांव येथील असल्याचे निष्पण झाले, सुनगावामध्ये या खूनाबद्दल विवीध चर्चा नागरीकांमध्ये सुरू होत्या, त्यामध्ये खून” का बदला खून”
हे सर्वात जास्ती चर्चिल्या गेले, सन 1995 मध्ये मोतीराम मारुती धुळे यांनी आरोपी शेषराव दामधर यांचे वडील सखाराम दामधर यांचा खून केला होता, त्या खूनाच्या गुन्ह्यामध्ये मारोती धुळे यांना शिक्षा झाली होती, शिक्षा भोगुन ते गावात राहत होते, दिनांक 9 नोव्हेबंर रोजी रात्री 10 वाजे दरम्यान मोतीराम धुळे हे शेषराव दामधर सोबत जातांना लोकानां दिसल्याने व फीर्यादी रवींद्र नारायण धुळे यांनी दिलेल्या फीर्यादी वरुन या खूनाचा लवकरच उलगडा झाला, रवींद्र धुळे यांच्या फीर्यादी वरुन आरोपी विरुद्ध भादवि कलमं 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल करन्यात आला आहे, पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनात जळगांव जामोद पोलीस करीत आहे












