
नांदुरा(प्रतिनिधी):-
स्थानिक पोलिसांनी अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या मोटरसायकल व आरोपीस निमगाव फाट्यावर अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 17/01/2024 रोजी पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार नांदुरा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शन व सूचना प्रमाणे डीबी पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद जंजाळ पोलीस नाईक राहुल ससाने पोलीस कॉन्स्टेबल विनोद भोजने असे ग्राम निमगाव बीट हद्दीमध्ये रेड कामी पेट्रोलिंग करत असताना. त्यांना गुप्त खबरे खात्रीलायक माहिती मिळाली की निमगाव गावामध्ये श्रावण महादेव इंगळे वय 29 वर्ष राहणार निमगाव तालुका नांदुरा हा त्याची जवळील डिस्कवर मोटरसायकलवर विदेशी दारू विक्री करिता निमगाव मध्ये घेऊन येत आहे.
अशा मिळालेल्या खबरेप्रमाणे ग्राम निमगाव येथील बस थांबयावर नकाबंदी करून विदेशी दारूची विक्री करण्याकरिता वाहतूक करणारा श्रावण महादेव इंगळे यास जागीच पकडून त्याचे कब्जातून
1) मॅकडोवेल्स कंपनीची सिंलबंद 180 एम एल च्या दारुच्या 5 नग शिशा प्रत्येकी 150/- रु. किंमती प्रमाणे 750 /- रुपये
2.) रॉयल्स स्टॅग 180 एम एल च्या दारुच्या 5 नग शिशा प्रत्येकी 180/- रु प्रमाणे एकुण 900/- रुपये
3) ऑफीसर चॉईस 180 एम एल च्या दारुच्या 5 नग शिशा प्रत्येकी 125/- रु. किंमती प्रमाणे 625 /- रुपये
4) इंम्पेरीअस ब्लु कंपनीच्यासिलबंद 180 एम एल च्या दारुच्या 5 नग शिशा प्रत्येकी 160/- रु. किंमती प्रमाणे 800/- रुपये
5) प्लॅस्टीक पोतडी कि.अं. 10/- रुपये
6) एक जुनी वापरती काळ्या रंगाची निळे पट्टेदार असलेली बजाज डिस्कव्हर कंपनीची मोसा क्र. MH 30 Z 783 कि.अं. २१,०००/- रुपये असा एकुण 24,085/- रु. चा प्रोव्ही मुददेमाल मिळून आल्याने पंचायत समक्ष जप्त करण्यात आला आहे.
नमूद विनोद भोजने यांचे फिर्यादवरून पोलीस स्टेशन नांदुरा येथे अप. क्रं. ४८/२०२४ कलम ६५ (ई) म.दा. का . सहकलम ३ (१)/१८१ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













