
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
येथील श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पत संस्था र नं 1052 ची 2023 ते 2028 या सत्रासाठी सार्वत्रिक निवडणूक होवून या निवडणुकीत ,प्रस्थापित माऊली पॅनल चे सर्व संचालक विजयी झालेत.
या संस्थेचे दि 01/02/24 ही अहर्तात दिनांकाला एकूण 1974 सभासद होते. परंतु प्रकाशित करण्याच्या दिनांकास ही सभासद संख्या 1903 होती या संस्थेसाठी एकूण 11 सदस्यांची निवड करावयाची होती. सर्वसाधारण मतदार संघात एकूण 9 सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज(नामनिर्देशन पत्र) भरले होते.
त्यापैकी विजयी विशाल विनायक भगत मते 927,सर्वात जास्त मते कृष्णराव उर्फ सचिन पंजाबराव देशमुख 1031 मते, अरुण तुकाराम खिरोडकार 914, सर्वात कमी मते मोतीलाल ओंकारदास राठी 862, ओमप्रकाश सीताराम राठी 949, शंकर नारायण ताडे 890, हे विजयी झाले.
या सर्वसाधारण मतदार संघात एकूण 1903 मतदार पैकी 1192 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्या पैकी वैध मते 1130 अवैध मते 62 निघाली महिला राखीव मतदार संघात 2 सदस्य अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात 3 उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्या पैकी अनिता चंद्रकांत जयस्वाल 927, ज्योती परेश राजपोपट 830 मते या दोन विजयी ठरल्या एकूण मतदान 1192 पैकी वैध मते 1137 अवैध मते 55 निघाली.
तर प्रत्यक्ष मतदाना पूर्वी इतर मागास प्रवर्गातुन कैलास रामभाऊ डोबे, अनु जाती जमाती मधून हरिदास माणिकराव माटे, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातुन वर्षा नितीन गिरी हे 3 संचालक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विजयी झाले होते. या 3 मतदार संघात कोणीच प्रतिस्पर्धी नव्हते.
सर्वसाधारण मतदारसंघातुन अतुल वसंतराव वानखडे यांची पत्नी ने महिला मतदार संघात जयमाला अतुल वानखडे यांनी एकाकी चांगलीच झुंज दिली सर्वसाधारण मतदार संघातुन अतुल नारायण कपले आणि योगेश अशोक टावरी हे पराभूत झाले. निवडणूक अधिकारी एम ए कृपलानी तर सहाय्यक म्हणून दिपक धर्माळ यांनी काम पाहिले.
निवडणूक शांततेत पार पडली मतदान बँलेट पेपर वर असल्याने दि 31 डिसेंबर ला 8वाजून 30 मिनिटांनंतर ही निवडणूक चे शासकीय प्रक्रिया सुरू होती.
मतमोजणी शांततेत पार पडली.













