महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) सराव प्रश्न मालिका

0
455

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) सराव प्रश्न मालिका

प्रश्न 1 -‘पत्नी’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता

पर्याय (1) धाव, (2) भरता, (3) कांता, 94) कलत्र

 

प्रश्न 2) ‘वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते’ या अर्थाची म्हण कोणती

पर्याय (1) बळी तो कानपिळी,  (2) चोराच्या मनात चांदणे,

(3) कर नाही त्याला डर कशाला, (4) दिव्याखाली अंधार

 

प्रश्न 3) ‘सोने’  या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द निवडा

पर्याय  (a) कनक, (b) सुवर्ण, (c) हेम,  (d) कांचन

पर्यायी उत्तरे (1)फक्त (a) व (b) बरोबर, (2) फक्त (a),  (b)  व (d) बरोबर,

(3) फक्त (c)  व  (d)  बरोबर,  (4) सर्व पर्याय बरोबर

 

प्रश्न 4) खालीलपैकी देशी शब्दाचा शब्द गट ओळखा

पर्याय  (1)तंबाखू , बशी, चावी, प्रीती  (2) साबण, फणस, हापूस, कोबी

(3) बाजरी, चिमणी, बोका, ओसरी  (4) कागद, मिठाई, नोकरी, दवाखाना

 

प्रश्न 5) ‘ जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते.’ या              वाक्याचा प्रकार ओळखा.

पर्याय (1) केवल संयुक्त, (2) मिश्र संयुक्त, (3)मिश्र वाक्य, (4) केवळ मिश्र संयुक्त

 

प्रश्न 6)  दंड नसलेले व्यंजन शोधा

पर्याय   (1) रक्त, (2) कष्ट, (3) अल्प, (4) अर्पण

 

प्रश्न 7)  ‘हर्ष’ चा विरुद्ध शब्द कोणता

पर्याय   (1) आनंद, (2) हानी, (3) खेद,  (4) मोद

 

प्रश्न 8)  ‘आपली पाठ आपणास दिसत नाही,’ या वाक्यातील ध्वन्यार्थ  पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा

पर्याय     (1)  दुसऱ्याचे दोष दिसत नाहीत, (2) स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही,

(3) स्वतःचे गुण स्वतःला दिसत नाही, (4) दुसऱ्याचे गुण दिसतात

 

प्रश्न 9) ‘गोडवा’ हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे

पर्याय   (1) सामान्य नाम (2) विशेष नाम (3) दर्शक नाम (4) भाववाचक नाम

 

प्रश्न 10)  ‘मी तुला राम कडून पाच रुपये देववीन’, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा

पर्याय –  (1) भावकतृक क्रियापद (2) संयुक्त क्रियापद (3) प्रायोजक क्रियापद (4) सहाय्यक क्रियापद

 

प्रश्न 11)  ‘पारध्याकडून मोर पकडला गेला’ या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा

पर्याय –  (1) कर्तरी (2) शक्य कर्मणी (3) कर्मकर्तरी (4) भावे

 

प्रश्न 12) समानार्थी शब्दांच्या कोड्या जुळवा

पर्याय

( a ) अमृत                         ( i ) शुक

( b ) पोपट                        ( ii ) विस्तव

( c ) अनल                        ( iii ) हिमांशू

( d ) चंद्र                         ( iv )सुधा

पर्यायी उत्तरे

(1) (a)-(iv), (b)-(i), (c)-(ii),(d)-(iii)   (2) (a)-(iv),(b)-(iii),(c)-(ii),(d)-(i)

(3) (a)-(iii),(b)-(iv),(c)-(i),(d)-(ii)     (4) (a)-(ii),(b)-(iii),(c)-(iv),(d)-(i)

 

प्रश्न 13) अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत

पर्याय – (1) इंग्रजी (2) पोर्तुगीज (3) फारसी (4) अरबी

 

प्रश्न 14) खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे

पर्याय – (a) वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण (b) एक ध्वनी, एक लिपीचिन्ह

(c) एक चिन्ह, एक ध्वनी (d) उच्चारण लेखनासाठी एकरूपता

पर्यायी उत्तरे

(1) फक्त (a) व (b) बरोबर, (2) सर्व पर्याय बरोबर

(3) फक्त (c)  व  (d)  बरोबर, (4) फक्त (a),  (b)  व (c) बरोबर

 

प्रश्न 15) कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळवणी, ठेवण किंवा रचना असते, तिला काय म्हणतात

पर्याय- (1) विभक्ती (2) धातूसाधिते (3) आख्यात (4) प्रयोग

 

प्रश्न 16) ‘मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाडले’ हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहेत

पर्याय – (1) मिश्र संकर प्रयोग (2) कर्मभाव संकर प्रयोग (3) भाव कर्तरी प्रयोग (4) कर्मणी प्रयोग

 

प्रश्न 17) यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता

पर्याय –  (1) संगम (2) जावक  (3) आयात (4) आगम

 

प्रश्न 18) ‘त्यांच्या मनात काहीतरी गोम आहे’ या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य अर्थ असणारा शब्द निवडा

पर्याय –  (1) दोष (2) व्यंग (3) व्याधी (4) रहस्य

 

प्रश्न 19) ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणावे

पर्याय (1) संकेत आर्थी (2) आज्ञार्थी (3) नाकारार्थी (4) विधानार्थी

 

प्रश्न 20) खालील शब्दापैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे

पर्याय (1) घशात (2) येण्याचे (3) करणेत (4) फौजांनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here