
वाशिम(प्रतिनिधी):- 13 हजाराची लाच घेताना महिला सरपंच पोलिसांच्या जाळ्यात
वाशीम (जि.प्र.)घरकुलाच्या आणि विहीरीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच घेताना मानोरा तालुक्यातील ग्राम पंचायत माहुली येथील सरपंच गौकर्ना विष्णू राठोड, (वय 50 वर्ष) व ,विष्णू मंगु राठोड. (वय 55 वर्षे) या खाजगी इसमास 16 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदार यांचे एक घरकूल तसेच त्यांच्या नातेवाईकांचे एक घरकुल असे दोन घरकुलच्या फाईलवर सही करण्याकरिता 4000 रु तसेच तक्रारदार यांचे नातेवाईकाच्या दोन विहिरीच्या फाईलवर सही करण्याकरिता 1000 रुपयांची लाच आरोपी सरपंच गौकर्ना विष्णू राठोड, (वय 50 वर्ष) व विष्णू मंगु राठोड. (वय 55 वर्षे) या खाजगी इसमाने 14000 रु ची मागणी करून तडजोडी अंती 13000 रु स्वीकारण्याचे मान्य केले.या तक्रारीवरून 16 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाई दरम्यान आरोपी विष्णू मंगु राठोड यांनी 13000 रु लाच रक्कम स्वीकारली. वृत लिहेपर्यंत आरोपींच्या यांचेविरुद्ध पोस्टे मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, ए. एस. आय. दुर्गादास जाधव,पोहवा असिफ शेख, राहुल व्यवहारे, पोना. संदिप इडोळे, समाधान मोघाड, चालक मिलींद चन्नकेसला यांनी केली.









