Home बुलढाणा प्रतिबंधक गुटखा (विमल) बाळगून त्याची विक्री व वाहतूक केल्याच्या प्रकरणातून आरोपीची मा....

प्रतिबंधक गुटखा (विमल) बाळगून त्याची विक्री व वाहतूक केल्याच्या प्रकरणातून आरोपीची मा. जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

0
141

प्रतिबंधक गुटखा (विमल) बाळगून त्याची विक्री व वाहतूक केल्याच्या प्रकरणातून आरोपीची मा. जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.

जळगाव जामोद:- प्रतिनिधी
काहिं दिवसापूर्वी
63000/_ रू. पेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याप्रकरणी पुंडलिक महादेव कपले, रा. जळगाव जामोद यांच्या विरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी खामगाव येथील सत्र न्यायाधीश श्री. लक्ष्मीकांत बिडवई यांच्या समोर होऊन न्यायालयाने आरोपीची दिनांक 11/07/2024 रोजी निर्दोष मुक्तता केली.

या खटल्याची हकीकत अशी की, दिनांक 28/12/2022 रोजी ना.पो. कॉ. अनिल दामोदर सुशिर यांनी गुप्त माहितीच्या आधारे पुंडलिक कपले हा उमापुर कडून जळगाव जामोद कडे जाणाऱ्या रस्त्याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विमल गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याची खबर मिळाल्याने पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलिस स्टाफसह नाकाबंदी करून पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातून तीन पोते विमल गुटखा, मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला होता व पोलिसांनी आरोपीविरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशनला भा. द. वी. चे कलम 328, 272, 273, 188 अन्वये आणि सहकलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(d), (e), 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 प्रमाणे फिर्याद दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर जप्त करण्यात आलेला गुटखा हा जवळपास रक्कम रुपये 63300/_ रुपयाचा होता.
सदर प्रकरणाची सुनावणी खामगाव येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या समोर झाली. फिर्यादी पक्षाने आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी तीन साक्षीदार तपासले परंतु कोणत्याही साक्षीदारांची साक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करू शकली नाही तसेच खटल्याचा अंतिम सुनावणीवेळी पोलिसांनी मारलेला छापा हाच बनावट व संशयास्पद आहे असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. विजय धर्मे यांनी न्यायालयात केला. आरोपीचे वकील यांनी घेतलेला बचाव आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, खामगाव यांनी आरोपीला निर्दोष मुक्त केले.

सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने जळगाव जामोद येथील ॲड. विजय धर्मे, ॲड. करीम खान, ॲड. उबैद शेख यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!