Home बुलढाणा श्री च्या दर्शनासाठी जळगाव जामोद ते शेगाव पैदल वारी संपन्न…

श्री च्या दर्शनासाठी जळगाव जामोद ते शेगाव पैदल वारी संपन्न…

0
127

 

जळगाव जामोद प्रतिनिधी-

धर्मवीर राजे संभाजी क्रीडा मंडळाच्या व गजानन भक्त मंडळ यांच्या संयुक्त आयोजनाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक 12 जानेवारी रोजी श्रीच्या दर्शनासाठी पैदल वारीचे आयोजन जळगाव जामोद ते शेगाव करण्यात आले होते. यावेळी अंबिका माता मंदिर येथे आरती होऊन दिंडी सकाळी जळगाव जामोद येथून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये जळगाव जामोद शहरातून शेगाव श्रींच्या दर्शनाकरिता निघाली. पैदलवारी ही जळगाव जामोद होऊन वडशिंगी, मडाखेड, भेंडवळ, भास्तन,जानोरी या मार्गे शेगाव श्रींच्या दर्शनासाठी पोहोचली. मार्गामध्ये पैदलवारीमधील वारकरी व भक्तांसाठी जेवणाची नाश्त्याची व्यवस्था जागोजागी श्रींच्या भक्तांनी केली होती. यावेळी पैदल दिंडीमध्ये १५०० ते १६०० वारकरी सहभागी झाले होते. या पैदल दिंडीमध्ये महिला भजनी मंडळे, पुरुष भजनी मंडळ, वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ यांचा सहभाग होता. दिंडीमध्ये कैलास बापू देशमुख ,मंगेश राजनकार, अरविंद सारोकार, मंगेश अढाव, प्रमोद मनसुटे, राजेश बाळापुरे, गणेश अढाव सुनील देशमुख, शरद जोशी, रुपेश इंगळे, धनंजय देशमुख, शाम वर्मा, गोपाल वर्मा, राहुल देशमुख, गणेश दाभाडे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच पालखीमध्ये डॉक्टर मंगेश बडेरे डॉक्टर अभिजीत देशमुख यांनी वारीमध्ये असणाऱ्या भक्तांना वैद्यकीय सेवा पुरवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!