कोल्हटकर महाविद्यालयात आहार आणि आरोग्य कार्यशाळा संपन्न

0
39

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

__”संतुलित व योग्य आहार घेतल्याने आरोग्य हे निरोगी व सुदृढ राहते”. __डॉ. कविता
गोमासे

 

कुठल्याही आजाराचे मूळ हे आहाराशी आहे, आहार योग्य व संतुलित घेतला तर आरोग्याचा समतोल राखता येतो तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या आहारात जंक फूड ,पास्ता , पिझ्झा ,बर्गर ,पाणीपुरी, भेळ यासारख्या पदार्थाचा खाण्याकडे जास्त समावेश होतो त्यामुळे स्थूलपणा तसेच वजन वाढणे, बद्धकोष्ठता यासारखे आजार उद्भवतात तसेच आहार अयोग्य असला तर त्यापासून त्वचारोग सुद्धा उद्भवतात त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे त्वचा तेलकट होणे काळे पांढरे चट्टे पडणे यासारखे त्वचेवर दिसून येतात यासाठी आहारात पूर्ण अन्न घटकांचा समावेश असावा तसेच जग पुढच्या आहारात उपयोग नसावा. योग्य आणि संतुलित आहार घेतल्यास आरोग्य हे सुदृढ व निरोगी राहते, असे प्रतिपादन प्रसिद्ध त्वचारोग, सौंदर्यतज्ञ डॉ.कविता पराग गोमासे यांनी केले. त्या दिनांक ९एप्रिल रोजी स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात मार्गदर्शन करताना कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बोलत होत्या. गृहअर्थशास्त्र विभागाअंतर्गत “आहार आणि आरोग्य यांचा मानवी जीवनावर तसेच किशोरवयीन मुलांवर काय परिणाम होतो “या वीषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली, तेव्हा त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि तर प्रा.डॉ. गिरीष कुलकर्णी यांची या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाली. यानंतर पाहुण्यांचे शब्द सुमनाने स्वागत कु. आरती राजुरकर हिने केले .

प्रा.डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी सुद्धा आपला मार्गदर्शनातून सांगितले की हे जंक फूड आपल्या आरोग्याला हानिकारक आहे ज्यामुळे हळूहळू त्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होत आहे तेव्हा किशोरवयीन मुला-मुलींनी आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करावे आहार संतुलित राहिला तर बौद्धिक व शारीरिक विकास चांगला होतो व सुदृढ आरोग्य प्राप्त होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या सुभाष वानखेडे हिने केले तर प्रास्ताविक ग्रुह अर्थशास्त्र विभागाच्या प्रा.अर्चना जोशी यांनी केले तर आरती राजूरकर हिने मान्यवरांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता करण्यात आली. या कार्यशाळेच्या यशस्वी ते करिता गृह अर्थशास्त्राच्या विद्यार्थिनी तसेच मानसि कुलकर्णी ,हर्षद धर्मे व प्रा. नीलिमा भोपळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here