Home बुलढाणा पुन्हा पोलिसांनी २ लाख ६५ हजार ३४७ रुपये किमतीचा गाडीसह गुटखा पकडला.....

पुन्हा पोलिसांनी २ लाख ६५ हजार ३४७ रुपये किमतीचा गाडीसह गुटखा पकडला.. .१ आरोपी अटकेत… मुख्य गुटका माफिया अजूनही मोकळाचं

0
94

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील निमखेडी फाट्या नजीक जळगाव जामोद पोलिसांनी संग्रामपूर तालुक्यातील आस्वंद या गावच्या व्यापाऱ्याचा त्याच्या ताब्यातील झेन सुझुकी गाडीसह २ लाख ६५ हजार ३४७ रुपयाचा अवैध गुटखा पकडल्याची घटना दिनांक ४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेदरम्यान घडली आहे. एका गुप्त माहितीवरून पोलिसांनी निमखेडी फाटा येथे नाकाबंदी केली होती. रात्री ८ सुमारास मारुती सुझुकी झेन वाहन क्रमांक एमएच ०३ एएफ ५३६५ ही गाडी संशयितरित्या भरधाव वेगाने जळगाव जामोद कडे येत होती. यावेळी नाकाबंदी दरम्यान उपस्थित पोलिसांनी गाडीला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये अवैध गुटखा आढळून आला. अवैध गुटख्याची तक्रार अन्नसुरक्षा अधिकारी गुलाब सिंह वसावे वय ५१ वर्ष यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दिली व मुद्देमाल मोजून पोलिसांच्या स्वाधीन केला.

मिळालेला माल पुढील प्रमाणे

१) रू १४४०० किमतीचे वाह पान मसाला प्रत्येकी रुपये १२० किमतीचे प्रत्येकी ०४ किमतीचे ३० पाऊचेस असलेले एकूण १२० पॅकेट.

२ )रु. १८०० किमतीचे डब्ल्यू च्युविग टॉबको प्रत्येकी रू १५ किमतीचे प्रत्येकी ३० पाऊचेस च्या प्रत्येकी २.५० किमतीचे पाऊचेस असलेले एकूण १२० पॅकेट.

३)४५०० किमतीचे पान बहार पान मसाला प्रत्येकी रू २२५ किमतीचे प्रत्येकी ४५ पाऊचेसच्या प्रत्येकी ५ किमतीचे पाऊचेस असलेले एकूण २० पॅकेट.

४) ३००० किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला प्रत्येक रु. १५० किमतीचे प्रत्येकी ६० पाऊचेस असलेले एकूण १२० पॅकेट्स.

५) ६०० किमतीचे व्ही-१ सुगंधित तंबाखू प्रत्येकी ३० रुपये किमतीचे प्रत्येकी ६० पाऊचेस असलेले २० पॅकेट्स.

 

६). रु. ३९६४४ किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला प्रत्येकी रू १८७ किमतीचे प्रत्येकी २२ पाऊचेस असलेले एकूण २१२ पॅकेट्स.

७) रु. ६९९६ किमतीचे व्ही -१ सुगंधित तंबाखू प्रत्येकी ३३ रुपये किमतीचे प्रत्येकी २२ पाऊचेस असलेले एकूण २१२ पॅकेट्स.

८) १८८००किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला प्रत्येकी रू ४७० किमतीचे किमतीचे ११ पाऊचेस एकूण ४० पॅकेट्स.

९). रू १२०० किमतीचे व्ही-१ सुगंधित तंबाखू प्रत्येकी ३० रुपये किमतीचे प्रत्येकी २२ पाऊचेस असलेले एकूण ४० पॅकेट्स. १०) रू २१७८० किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला प्रत्येकी रू १९८ किमतीचे प्रत्येकी ११ पाऊचेस असलेले एकूण ११० पॅकेट्स.

११)रू २४२० किमतीचे व्ही-१ सुगंधित तंबाखू प्रत्येकी २२ किमतीचे प्रत्येकी २२ पाऊचेस असलेले एकूण ११० पॅकेट्स .

१२) रू १ लाख ५० हजार किमतीची जुनी वापरती मारुती सुजुकी प्रवासी वाहन क्र. एमएच ०३ एएफ ५३६५ असा एकूण २ लाख ६५ हजार ३४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामधील आरोपी उमेश दिंगबर लाहे वय ३४ वर्ष रा. आस्वद ता.संग्रामपुर जिल्हा-बुलढाणा यास अटक करून याच्या विरोधात अप क्रमांक २११/२०२५ कलम अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम व भारतीय न्याय संहितेच्या कलम२२३ कलम २७४ कलम २७५ व कलम १२३ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली असली तरी मुख्य गुटका माफिया यांचा सूत्रधार अजूनहीपडद्या आडच व मोकळाचं का अशी चर्चा नागरिकांत सुरु आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!