सागवानी चोप विरोधात वनविभागाची मोठी कारवाई ३ आरोपी अटकेत

0
22

सागवानी चोप विरोधात वनविभागाची मोठी कारवाई ३ आरोपी अटकेत…

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील जामोद वर्तुळात वनरक्षक राहुल तायडे व वनरक्षक अमोल हिवाळे यांनी वनामधुन अवैध सागवान चोप अवैधरित्या विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ३ आरोपींना पकडले आहे. दिनांक १५ एप्रिल रोजी जामोद वनपरिक्षेत्रामध्ये रात्री गस्त करीत असताना वनपाल राहुल तायडे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी आपले सहकारी अमोल हिवाळे व इतर वनकर्मचाऱ्यांसह कुवरदेव जामोद रोडवरील कुवरदेव नदी पुलावर नाकाबंदी केली व समोरून येणाऱ्या संशयित मोटरसायकल स्वारांना थांबवून विचारणा केली यावेळी दोन्ही मोटरसायकलची झडती घेतली असता त्यावर ७ सागवान चोप मिळून आल्या. त्याबद्दल आरोपींना विचारणा केली परंतु त्या सागवान चोपचे कोणताही वाहतूक परवाना त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हता. म्हणून तीनही आरोपींना वनरक्षक अमोल हिवाळे व वनरक्षक राहुल तायडे यांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकलींसह ४९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून तीनही आरोपी युसुफ खान बाबा खान, शाकीर खान युसुफ खान व शेख सलीम शेख रफिक हे सर्व राहणार जामोद यांना दिनांक १५ एप्रिल रोजी अटक केली. आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१,४२,५२,६१ (अ),६५(अ) महाराष्ट्र वन नियमावलीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायला समक्ष हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना दिनांक १९ एप्रिल पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई डीसीएफ गवस मँडम,एसीएफ आपेट मँडम, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक अमोल हिवाळे, वनरक्षक राहुल तायडे, वनरक्षक कुशोळ, वनरक्षक हागवणे, वनरक्षक गव्हाणे यांनी केली असून पुढील तपास वनपाल अतुल बडगुजर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here