Home बुलढाणा बस स्टँड परिसरात जळगाव जामोद पोलिसांचे मॉक ड्रिल…

बस स्टँड परिसरात जळगाव जामोद पोलिसांचे मॉक ड्रिल…

0
111

 

जळगाव जामोद प्रतिनिधी.अमोल भगत :-

पहलगामवरील हल्ल्यानंतर देशात संतापाचे वातावरण बघायला मिळाले. पाकिस्तान विरोधात भारताने कडक भूमिका घेतली. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.हेच नाही तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीये काल रात्री पाकिस्तान मध्ये घुसून भारतीय लष्कराने ९० अतिरेक्यांचा खात्मा केला असून,केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ करण्याचे निर्देश दिले होते.सुमारे ५४ वर्षांनी मॉक ड्रिल होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातही जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिनांक ६ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याबाबत सर्वांना सूचना केल्या होत्या त्या सूचनेचे पालन करीत जळगाव जामोद पोलीस स्टेशन ने स्थानिक बस स्थानक परिसरामध्ये मॉक ड्रिल चे आयोजन केले होते यावेळी विविध प्रात्यक्षिके तसेच बस स्थानकातील प्रवासी व नागरिकांना मॉक ड्रिल संबंधित माहिती ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी दिली. यावेळी बस स्थानक परिसरामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याच्या सायरनला कसे प्रतिसाद द्यायचे आणि ब्लॅकआउट परिस्थिती कशी हाताळायची, मॉक ड्रिलचे प्राथमिक उद्दिष्ट नागरिकांना शांत राहण्यास, सुरक्षित आश्रय घेण्यास आणि हवाई हल्ला किंवा इतर हल्ल्यांच्या बाबतीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ,नायब तहसीलदार मार्कंड,नायब तहसीलदार भुजबळ, कर्मचारी स्वप्निल भारस्कर, कर्मचारी सागर भारसाकडे, पीएसआय नारायण सरकटे, पीएसआय अमोल पंडित,पीएसआय स्नेहा शेंडगे, पीएसआय नितनवरे,पीएसआय कांबळे,पो.हे.काँ.अमोल बोदडे, शांतीलाल धिरबस्सी,ना.पो.काँ.भागवत उबरहंडे, रामदास घट्टे, ग्यानसिंग राठोड,पोलीस अंमलदार सचिन राजपुत,प्रेमसिंग पवार ,शेख अयुब,भरत बोंद्रे, संतोष कात्रे, स्वप्निल मस्के,सतीश पटोले,सुपाजी तायडे, स्वप्निल झुंजारकर, अनंता गावंडे,नगरपरिषदचे शुभम रोजतकार,ऋषिकेश इथापे, अनिल मिसाळ,सय्यद नदिम ड्रायव्हर अग्निशामक गाडी यांच्यासह, आरसीपी पथकातील जवान, बस आगारातील वाहन चालक व वाहक, प्रवासी वर्ग शाळेचे विद्यार्थी यावेळी मॉक ड्रिल साठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!