Home बुलढाणा चांडक विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न

चांडक विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न

0
86

चांडक विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न

 

मलकापूर तालुका प्रतिनिधी श्रीकृष्ण तायडे:-

 

विद्यार्थी जीवनात दहावी चे वर्ष अतिशय महत्त्वाचे मानले जाते. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्या मनात अनामिक भिती निर्माण होण्याची दाट शक्यता असते. पालकांच्या अपेक्षा विद्यार्थ्यांना नैराश्येच्या खोल गर्तेत ढकलू शकतात. ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लि.भो.चांडक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा आयोजित केला होता.

 

 

शिक्षक पालक सभेचे अध्यक्षस्थान पालकांमधून स्थानिक भुमि अभिलेख कार्यालयातील कवळे यांनी भुषविले. दहावीच्या पाचही विभागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी पालकांसह सभेला उपस्थित होते. शिक्षक प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिक्षेला कमी दिवस राहिले असले तरी वेळेचे योग्य नियोजन केले तर मनावर अभ्यासाचा ताण येणार नाही असे मार्गदर्शन करुन पालकांसोबत घरी अभ्यासाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी संवाद साधला.

 

 

गणित शिक्षक निलेश हिवाळे यांनी गणित विषयात होणाऱ्या संभाव्य चुकांची जाणीव करुन देऊन त्या चुका टाळण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. उपप्राचार्य निवृत्ती निंबोळे यांनी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या कॉपीमुक्त परीक्षा अभियान संबंधी मार्गदर्शन करुन पालकांसोबत संवाद साधला. प्राचार्या विद्याताई काळबांडे यांनी विज्ञान विषयात जास्तीत जास्त गुण मिळवता येण्यासाठी अभ्यासाच्या सोप्या पद्धती सांगून सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेच्या शुभेच्छा दिल्या. सभेचे संचलन राजु सुरळकर व आभारप्रदर्शन पंकज मेतकर यांनी केले.

 

 

 

सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!