Home बुलढाणा गजानन टॉकीज रोडवरील खड्डा म्हणजे मृत्यूचा सापळा

गजानन टॉकीज रोडवरील खड्डा म्हणजे मृत्यूचा सापळा

0
128

गजानन टॉकीज रोडवरील खड्डा म्हणजे मृत्यूचा सापळा

प्रशासन अजूनही प्रगाढ झोपेत

मलकापूर तालुका प्रतिनिधी श्रीकृष्ण तायडे :-

शहरातील गजानन टॉकीज रोडवर रस्त्याच्या मध्यभागी पडलेला एक मोठा खड्डा नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र समोर आले आहे. दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर हा खड्डा म्हणजे जणू मृत्यूचा सापळाच बनला असून, या ठिकाणी केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

 

विशेष म्हणजे, या खड्डयात दररोज दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहने अडकत असून, अनेकवेळा वाहनचालक थोडक्यात बचावले आहेत. अचानक ब्रेक, घसरलेली वाहने, संतुलन बिघडून पडलेले नागरिक असे प्रकार सातत्याने घडत असतानाही संबंधित प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

 

 

 

गजानन टॉकीज रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा
खड्ड्यात अडकलेले कारचे चाक काढण्याचा प्रयत्न करताना नागरिक
आणि महत्त्वाचा रस्ता असून, व्यापारी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेला हा खोल आणि रुंद खड्डा पाहता वाहनचालक अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत.

 

 

 

रात्रीच्या वेळी या खड्ड्याचा अंदाज येणे कठीण होत असून, अपघाताचा धोका अधिकच वाढतो. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने केवळ दुर्लक्षच केले नाही, तर खड्ड्याजवळ कोणतीही सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा
तात्पुरती उपाययोजना देखील करण्यात आलेली नाही. परिणामी, वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

 

वाहनांचे नुकसान तर होत आहेच, पण जीवितहानी होण्याचा धोका अधिक गंभीर बनला आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने तत्काळ या खड्ड्यावर ढापा टाकून रस्ता दुरुस्त करावा व सुरक्षित वाहतुकीची हमी द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!