Home बुलढाणा पाण्यासाठी सिद्धार्थ नगर मधील महिलांचा आक्रोश

पाण्यासाठी सिद्धार्थ नगर मधील महिलांचा आक्रोश

0
1169

पाण्यासाठी सिद्धार्थ नगर मधील महिलांचा आक्रोश

एक महिन्यापासून पाणी पुरवठा खंडित

जळगाव जा :- अनिल दांडगे

मागील एक महिन्यापासून शहरातील सिद्धार्थ नगर मधील राठी जिनिंगच्या पाठीमागील मागासवर्गीय वस्ती आहे या वस्तीमध्ये पाणीपुरवठा होत नसल्यामुळे भर उन्हाळ्यात महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

 

शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग जळगाव जामोद 140 गाव पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असून शहरातीलच मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय भाग असलेल्या सिद्धार्थ नगरमध्ये एका महिन्यापासून पाणीपुरवठा खंडित झाला असून त्या सदर्भातील निवेदन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग जळगाव जामोद यांना 20 जानेवारी रोजी देण्यात आले होते परंतु सदर निवेदनाचे साधी दखलही घेतली नसून आतापर्यंत त्या वस्तीमध्ये पाण्याची परिस्थिती तशीच आहे नुकताच उन्हाळ्याची चाहूल लागली असून पाणी हा एक जुना असे घटक असून पाण्यासाठी त्या परिसरातील महिलांंना पायपीट करावी लागत आहे. तर मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना मजुरी ला न जाता पाण्यासाठी घरीच राहावे लागत आहे.

 

 

यासंदर्भात पाणीपुरवठा योजना विभागातील अधिकाऱ्यांची संपर्क केला असता त्यांनी येत्या आठ दिवसात सिद्धार्थ नगर वस्ती मधील पाणीपुरवठा लाईन व्यवस्थित केला जाईल असे सांगितले.
आम्हाला फक्त पाणी द्या. आम्ही हजारो रुपये पाण्याचे बिल भरतो परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावे लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करून आम्हाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी सिद्धार्थ नगर मधील कांचन पारवे ,सुनीता वानखडे, जया अंभोरे ,ललिता तायडे, अमिना परवीन अजीज, शेख अबिदा ,अश्विनी तायडे, पद्मा जाधव, मीना तायडे, अनिता चांदुरकर ,उज्वला तायडे,पूजा सपकाळ महिलांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!