Home बुलढाणा मलकापूर येथील राजे नेमिवंतांची ऐतिहासिक हवेली पाडण्याचा डाव

मलकापूर येथील राजे नेमिवंतांची ऐतिहासिक हवेली पाडण्याचा डाव

0
28

राजे नेमिवंतांची ऐतिहासिक हवेली पाडण्याचा डाव

खजिन्याच्या हव्यासासाठी इतिहासाची आहुती

सागवान दरवाजे, भुयारांच्या कथांनी गाजलेली वास्तू धोक्यात

प्रशासनाकडून नोटीस

श्रीकृष्ण तायडे मलकापूर तालुका प्रतिनिधी :-

ऐतिहासिक ओळख असलेल्या जुन्या गावातील दुर्गानगर येथील राजे नेमिवंतांची हवेली पाडण्यात येऊन पुरातन वारसा नामशेष करण्याची बाब समोर आली आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

 

याबाबतची माहिती अशी की, जुन्या गावामध्ये दुर्गानगर परिसरात ऐतिहासिक अशी राजे नेमिवंतांची हवेली ही वास्तू गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. यामध्ये मौल्यवान सागवान लाकडाचे दरवाजे, त्या काळातील बांधकाम, भव्य असा मोठा दरवाजा व ज्या हवेलीमधून गोपनीय
मौल्यवान साहित्याच्या हव्यासापोटी पाडण्यात आलेली राजे नेमिवंतांची हवेली भुयारी रस्ता हा लालबाग (मलकापूर) व ब-हाणपूर येथे पोहोचत असल्याचे बोलल्या जाते.

 

 

 

राजे नेमिवंत हवेलीच्या वारशावर घाला की खजिन्याचा हव्यास, यामुळे या वास्तूचा निर्दयी अंत सुरू झाला की काय, अशी चर्चा जुन्या गावातील परिसरात रंगली आहे.

 

 

 

परिसरातील इतिहासप्रेमींनी ही बाब समतेचे निळे वादळचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण सभापती अशांतभाई वानखेडे यांच्या कानावर टाकली. यानंतर त्यांनी तातडीने मुख्याधिकारी संजय केदार यांना, संबंधितांना नोटीस बजावून न.प.ची परवानगी घेतली काय, याबाबत जाब विचारण्याचे निर्देश दिले.

 

 

 

 

यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी राजे नेमिवंताच्या हवेलीचे काम पाहणारे मनोहर खाडे यांना ९ एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

 

राजे नेमिवंतांची ही हवेली ऐतिहासिक असून, हवेलीला आजपर्यंत देशी-विदेशी पर्यटकांसह इतिहासप्रेमींनी भेट देऊन त्याबाबतच्या नोंदी केलेल्या आढळतात, तर बुलढाणा जिल्हयाच्या गॅझेटमध्येही या हवेलीची नोंद आहे, हे उल्लेखनीय.

 

 

 

नेमिवंतांच्या हवेलीमध्ये पुरातन सागवान लाकडे आहेत, ज्यावर कोरीव काम आहे. भव्यदिव्य असे दरवाजे आहेत. हे सर्व साहित्य मुंबई येथील चित्रनगरीत काम करणाऱ्या एका निर्मात्याला देणार असल्याची खमंग चर्चा असून, त्याकरिताच ही हवेली पाडण्याचा घाट घातला जात असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!