Home बुलढाणा घरासमोरून दुचाकी चोरी !

घरासमोरून दुचाकी चोरी !

0
195

जळगांव जा. :- दि. ०३ नोव्हेंबर २०२३ जळगाव जामोद सेवकदास नगर बाणाईत ले-आऊट येथील रामदास लक्ष्मण         कपले  हे नेहमी प्रमाणे संध्याकाळी त्यांच्या कार्यालयातून घरी आल्यानंतर त्यांची दुचाकी क्र.एम एच २८ ए आर ७१०६ घराच्या समोर अंगणामध्ये उभी केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ च्या दरम्यान त्यांच्या वहिनी उठल्या त्यांनी घराबाहेर बघितल्यास त्यांना दुचाकी दिसली नाही. तेव्हा त्यांनी घरात विचारले कोणी दुचाकी घेऊन  बाहेर गेले का? रामदास कपले यांनी  घरा बाहेर पाहले असता गाडी त्यांना दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला व जळगाव शहरात सुद्धा शोध घेतला परंतु त्यांना गाडी मिळाली नाही. त्यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध रिपोर्ट दिला असता. भारतीय दंड संहिता कलम ३७९ नुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास हे.कॉ. समाधान तायडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!