Home बुलढाणा पूरग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी उभारलेल्या आंदोलनाला यश.!!

पूरग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी उभारलेल्या आंदोलनाला यश.!!

0
143

पूरग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी उभारलेल्या आंदोलनाला यश.!!

जळगांव जा :- प्रतिनिधी

११ नोव्हेंम्बर रोजी स्थानिक पक्ष कार्यालयात वंचित बहुजन आघाडीने दिवाळीच्या दिवशी पुकारलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने बैठक घेण्यात आली या बैठकीत आंदोलनातील मागण्या तहसिलदार मॅडम यांनी आंदोलनाच्या दोन दिवस आधीच जाहीर केल्याने होणारे आंदोलन मागे घेण्यात येत आहे आणि केलेल्या आंदोलनाला यश आल्याने शासन प्रशासनाचे आभार मानून बैठक घेण्यात आली या बैठकी मध्ये दि २२ जुलै रोजी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जळगांव जामोद तालुक्यातील प्रत्येक नदी नाल्याला प्रचंड महापूर आला होता या महापुरात हजारो हेक्टर शेती खरडून गेली, पिके वाहून गेली,शेतातील ठिबक संच वाहून गेले परंतु शेतकऱ्यांना शंभर दिवस उलटूनही आर्थिक मदत मिळाली नाही वंचित बहुजन आघाडीने दि १२ नोव्हेंम्बर रोजी भर दिवाळीच्या दिवशी शासन प्रशासनाचा निषेध म्हणून चटणी भाकर आंदोलन करण्याचा इशारा दिला परंतु दि.१० नोव्हेंम्बर ला रात्री उशिरा पीक नुकसानीची यादी जाहीर केली त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेले निषेध आंदोलन मागे घेण्यात येत आहे. तसेच या पूरग्रस्त शेतकरी मायबाप जनतेच्या न्यायहक्कांसाठीं या पूर्वी अर्धनग्न आंदोलन, आमरण उपोषण, प्रशासन जागर आंदोलन अश्या वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून शेतकरी शेतमजुरांना न्याय देन्यासाठी प्रशासनासोबत आंदोलनाच्या माध्यमातून लढत राहिले तसेच या पुढे सुद्धा शेतकरी शेतमजुर पुग्रस्तपीडित अतिक्रमण पीडित कुटुंबाना जो पर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलने करून त्याच्या नायहक्कांसाठी लढत राहील असे आज दि ११ नोव्हेंम्बर रोजी जळगांव जामोद पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले त्या वेळी वंचित चे मा.ता.अध्यक्ष रतन नाईक, जिल्हा संघटक अरुणभाऊ पारवे,ता उपाध्यक्ष सुनील बोदडे, युवा नेते प्रकाश भिसे, शहर अध्यक्ष आझम कुरेशी,जेष्ठ कार्यकर्ते यु बी धुंदाळे, गुलाबराव आठवले, ज्ञानेश्वर कोकाटे, संतोष पवार ,अमोल तायडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!