
जळगाव जामोद प्रतिनिधी-
तालुक्यातील पळशी सुपो येथील शेत शिवारातील राठी यांच्या शेतात असलेल्या विद्युत रोहित्राचे अज्ञात इसमाने नुकसान केल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे. तसेच वीजपुरवठा करणाऱ्या बॉक्सची तोडफोड केली असून येथील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद असून या शेतकऱ्यांनी महावितरण जळगाव जामोद उपकार्यकारी अभियंता यांना विद्युत रोहित्रावरील नवीन पेटी बसवून शेतकऱ्यांचा बंद पडलेला वीजपुरवठा सुरळीत चालू करून देण्यात यावा तसेच पेटीचे नुकसान करणाऱ्यावर अज्ञात इसमावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सुपो पळशी येथील शेतकऱ्यांनी दिनांक ०८ जानेवारी रोजी दिले. यावेळी सुपो पळशी येथील शेतकरी ज्ञानेश्वर वानेरे, दिनेश राखोंडे, बळीराम वानखडे, प्रदीप वानखडे, सुपडा ठाकरे, संजय राखोंडे, निलेश उभे, हरिदास फाळके,मधुकर दाभाडे, महादेव चव्हाण, प्रल्हाद बोंबटकार आदी शेतकरी उपस्थित होते..













