
खामगाव:- राज्य सरकारच्या प्रस्तावित नवीन कृषी कायद्यामुळे कृषी केंद्र चालकावर अन्याय होणार असल्याचा आरोप करत काळ ०२ नोव्हेंबर पासून राज्यभरातील कृषी केंद्र चालक गेले असून यात खामगावतील सर्व कृषी केंद्र चालक सहभागी झाले आहेत.
बनावट कृषी निविष्ठाप्रकरणी विक्रेत्यांना जबाबदार धरत त्यांच्याविरुद्ध राज्य सरकार तयार करीत असलेल्या कृषी कायद्यला राज्यातील कृषी विक्रेता संघटनेकडून तीव्र विरोध केला जात आहे. या कायद्याला विरोध म्हणून २ ते ४ नोव्हेंबर या तीन दिवसांत कृषी विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय कृषी केंद्र संघटनेने घेतला आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादक असोशिएशनही सहभागी झाले. असून याबाबत संघटनेने शासनाला निवेदन दिले आहे. प्रस्तावित कायद्यातील बियाणे, कीटकनाशक, रासायनिक खतांच्या सॅम्पल फैल प्रकरणात सौर्स सिद्ध होत असूनही कृषी केंद्र चालकावर फोजदारी कारवाई होते. यामुळे कृषी केंद्र संघटनांनी या विरोधात आवाज उठवत या बंदची हाक दिली असून यात खामगावतील सर्वच कृषी केंद्र चालक सहभागी झाले असून काल पासून शहरातील तसेच तालुक्यातील सर्व कृषी केंद्र बंद आहेत. जर कृषी केंद्र चालकांनी पूर्ण नियमाप्रमाणे खरेदी व विक्री केली तर त्यास सॅम्पल फेल केस मध्ये विक्रेत्यावर FIR किंवा फोजदारी गुन्हा दाखल न करता फक्त साक्षीदार चौकशी अंती ठेवल्या जावा, निकृष्ठ दर्जाचा कृषी निविष्ठाची नुकसान भरपाई विक्रेत्यांवर टाकण्यात येऊ नये, जे विक्रेता परवानाधारक आहेत ते कायद्यात बांधलेले आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र गुड अक्ट लावण्यात येऊ नये, जे काही तथाकथित लोक बिना परवाना, नियम तोडून व विना परवानगीचे कृषी निविष्ठा विकतात त्यांच्यावर महाराष्ट्र गुड अक्ट लावण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बुलढाणा जिल्हा कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक असोशिएशन खामगाव तालुका अध्यक्ष संजय (मुन्ना) पूर्वर यांनी दिली आहे.













