जळगाव जामोद येथील मराठा आंदोलनात महिला उतरल्या रस्त्यावर…..

0
169

जळगाव जामोद :- प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणास बसलेले आहे त्यांच्या समर्थनार्थ जळगाव जामोद तालुक्यातील मराठा समाजाने गेल्या तीन दिवसापासून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु केले आहे.

या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनाने पेट धरलेला असुन अनेक तरुणांनी आपली जिवन यात्रा सुद्धा संपवली आहे. बरं एवढा मोठा लढा देऊन सरकार लक्ष का देत नाही. आम्ही मराठा समाज बांधव मरणाच्या दारात उभे असतांना सरकारने आरक्षण देणे खुप महत्वाचे आहे. कारण मराठा आरक्षण हा प्रश्न खुप महत्वाचा आहे.

त्या समर्थनार्थ चालू असलेल्या साखळी उपोषणाला जळगाव जामोद तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी सुद्धा पाठिंबा दिला तसेच या उपोषण मंडपामध्ये दिवसेंदिवस बहुसंख्य मराठा तरुणांसोबतच महिलांचा सुद्धा सहभाग मोठ्या सख्येंने दिसून येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here