Home बुलढाणा मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी तीव्र खामगांव एसटी बसेसवरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला फासले...

मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी तीव्र खामगांव एसटी बसेसवरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला फासले काळे

0
154
खामगाव: -मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पेटलेले आंदोलन खामगावात आणखी तीव्र होताना दिसत असून आज सकल मराठा समाजाच्या वतीने येथील एसटी बस स्थानकावर प्रचंड घोषणाबाजी करत एसटी बसेसवरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला समर्थन देत खामगावात सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण व साखळी उपोषण सुरू आहे हे आंदोलन आणखी तीव्र होताना दिसत असून आज संतप्त झालेल्या मराठा समाज बांधवांनी खामगाव एसटी बस स्थानकात जाऊन एसटी बसेस वरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला काळे फासून जाहीर निषेध नोंदविला यावेळी मराठा समाज बांधवांनी प्रचंड घोषणाबाजी करत सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!