
पिक विमा कंपनीकडून पोस्टरचे अनावरण
जळगाव जामोद: – प्रतिनिधी
भारतीय कृषी विमा कंपनी यांच्याकडून तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगांव जामोद येथे खरिप पिक विमा २०२४-२५ चे पोस्टर व पॉम्पलेट चे अनावरण करून प्रचार प्रसिद्धीस सुरुवात करण्यात आली तसेच राज्य शासनाकडून १ रुपयात पिक विमा या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हाहन तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे, यावेळी तहसीलदार शीतल सोलत, तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोदे, मंडळ कृषी अधिकारी संदीप सावंत, शिंदे , संखिकी अधिकारी सुरडकर साहेब, पिक विमा प्रतिनिधी प्रसाद वनारे, अमोल नागपुरे व धनंजय वाघ व शेतकरी उपस्थित होते













