Home बुलढाणा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला बेशरम चे झाड लावून केला निषेध राष्ट्रवादी (शरदचंद्र...

गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला बेशरम चे झाड लावून केला निषेध राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने व्यक्त केला निषेध

0
110

गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला बेशरम चे झाड लावून केला निषेध राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने व्यक्त केला निषेध

 

जळगाव जामोद:- प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने घरकुल लाभार्थी यांच्या साठी हल्लाबोल आंदोलन करण्यात येनार आहे. तरी त्या आंदोलनाची पूर्व कल्पना देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती जळगाव जामोद यांना भेटायला गेले असता नेहमी प्रमाणे आज पण गटविकास अधिकारी उपस्थित नव्हते. तालुक्यातील सरपंच यांच्या वारंवार तक्रार असतात की गटविकास अधिकारी साहेब उपस्थित नसतात आज राष्ट्रवादी चे संतप्त पदाधिकारी यांनी कार्यालयाला बेशरम चे झाड लावुन निषेध व्यक्त केला. अधिकार्याची मुजोरी वाढलेली असुन लोकप्रतिनिधीच त्यांच्यावर कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे अधिकार्याना कुठलाच धाक राहिलेला नाही असा आरोप तालुकाध्यक्ष प्रमोद संपकाळ यांनी यावेळी केला.जनतेला असाच त्रास होत राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्याचा ईशारा देण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ,तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक, शहर अध्यक्ष इरफान खान, विधानसभा अध्यक्ष दत्ता पाटील, एजाज देशमुख, पूर्शोत्तम ताकोते, विशाल वाघ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!