बनावट कागदपत्रांनी आदिवासी जमिनीची विक्री पोलिसात तक्रार; कारवाई करण्याची मागणी

0
55

बनावट कागदपत्रांनी आदिवासी जमिनीची विक्री पोलिसात तक्रार; कारवाई करण्याची मागणी

 

जळगाव (जा), :- प्रतिनिधी

 

सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी गाव, वाड्या, वस्त्यांवरील शेकडो आदिवासींनी जळगाव शहर परिसरात आणि लगतच्या परिसरात राहत्या वस्त्यांमध्ये प्लॉट, जमिनी मोठ्या प्रमाणात घेतल्या आहेत. त्यांचे प्लॉट शहरात असले तरी ते आदिवासी बांधव शेतीसाठी आपल्या मूळ गावी, मूळ वस्ती मध्ये वाड्यावर राहतात. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून बनावट व्यक्ती उभे करून त्यांचे प्लॉट परस्पर विक्री करणारे रॅकेट शहरात सक्रिय असून नुकताच असा प्रकार उघडकीस आला आहे.

 

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम आदिवासी ग्राम चारबन, उमापूर येथील उदयसिंग ढेमसिंग ससत्या यांनी १५ जुलै रोजी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे की, राजीव नितवणे, संजय भुजबळ, दीपक म्हसाळ, देवानंद वानखडे, चंद्रकांत बावस्कर, अशोक गिरजापुरे यांनी माझी फसवणूक करून माझा जळगाव जामोद येथील खेल चतारी शिवारातील अकृषक झालेल्या प्लॉटची परस्पर विक्री सौदा

 

करून तिहाइताने माझे नावे इसार घेतला असे नमूद केले आहे. संबंधित प्लॉट नितवणे नावाचे व्यक्तीचे खोटे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड व खाते पुस्तक तयार करून परस्पर विक्री करण्याच्या विचारात होते. मात्र दुय्यम निबंधक कार्यालयात अंगठ्याचा ठसा संशयास्पद वाटला. त्यामुळे ती खरेदी थांबली. संजय भुजबळ हे माझे प्लॉट विकत घेणार होते आणि त्यांनी तसा इसार तिहाइत व्यक्तीला दिला होता. दीपक म्हसाळ यांनी बनावट दस्तावेज तयार केले होते. तर देवानंद वानखडे आणि चंद्रकांत बावस्कर हे सुद्धा बनावट साक्षीदार झाले होते. ह्या प्रकरणातील दस्तऐवज लेखक आणि सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारकर्ते आदिवासी उदयसिंग ढेमसिंह यांनी पोलीस स्टेशनकडे केली आहे. दरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर प्लॉट विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा सुरू असून यात काही अधिकारी सुद्धा सहभागी असल्याची माहिती आहे. त्यामुळे वरिष्ठांनी सखोल चौकशी करून प्रकरणाचा निवाडा करण्याची गरज आहे.

 

संशय आल्याने पोलिसात तक्रार

 

■ संजय भुजबळ हे उदयसिंग ढेमसिंग ससत्या यांचा प्लॉट खरेदी करणार होते. इसार सुद्धा दिला होता. परंतुप्लॉट विकणाऱ्याची

 

कागदपत्र, आधार पडताळणी करताना आधार कार्डवर संशय आला.

 

बोटाचे ठसे, डोळ्याचे ठसे संशयास्पद वाटले. संबंधित व्यक्तीची तपासणी केली, म्हणून आपण ती खरेदी थांबवून पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि त्यानंतर मूळ मालक उदयसिंग यांनी सुद्धा पोलिसात तक्रार दाखल केली, असे दुय्यम निबंधक चव्हाण यांनी

 

पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here