कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदाचा दर्जा द्या
जळगाव जामोद प्रतिनिधी
महसूल विभागातील कार्यरत कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदाचा दर्जा देण्यात यावा या करिता जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील कोतवाल कर्मचारी यांनी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ. डॉ.संजय श्रीराम कुटे विधानसभा मतदार संघ जळगाव जामोद यांना निवेदन दिले
कोतवाल हे पद महसूल विभागात स्वातंत्र पुर्व काळापासून अस्तित्वात आहे परंतु आता पर्यंत या पदाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदाचा दर्जा न देता अ वर्गीकृत कर्मचारी म्हणुन सेवा घेत आहेत
सदर पदावरील कर्मचारी हे नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यां प्रमाणे महसूल विभागातील सर्व कामे करतात परंतु कोणताही वर्ग श्रेणी नसाल्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांन प्रमाणे योग्य तो लाभ दिला जात नाही यासाठी कोतवाल संघटनेच्या वतीने पर्यन्त सुरु आहेत
याचाच एक भाग म्हणुन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री. आ. डॉ. संजय श्रीराम कुटे विधानसभा मतदार संघ जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले असून शासना कडे आमच्या मागणी चा पाठपुरावा करावा अशी विनंती कोतवाल संघटना तालुका शाखा जळगाव जामोद व संग्रापुर यांच्या वतीने करण्यात आली














