

संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारच्या गुटखा विक्रीला बंदी घातली असून गुटखा विक्री करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची आदेश दिलेले आहेत असे असतानाही तालुक्यात गुटखा विक्री हे व्यापारी खुल्या प्रकारे गावोगावी येऊन गुटख्याच्या पुरवठा कोणाच्या आशीर्वादाने करत आहे असा सवाल सुद्धा नागरिक विचारत आहे
हे अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना माहिती नसावी हे नवलच वाटले
या गुटका विक्री मुळे नागरिकाचे तसेच शालेय विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात आले आहे
या व्यवसायाला पाठबळ कुणाचे अशा तऱ्हेचे प्रश्न लोक करीत आहे तालुक्यात खुलेआम खेडो पाडी गावागावात लहानात लहान दुकानावर सुध्या बंदी असलेल्या गुटक्या पुड्या सर्रास पने विक्री करताना दिसतात व
व्यापारी दिवसा दुचाकी ,
चारचाकी वाहने वापरत असल्याचे दिसून आले शासनाने बंदी घातलेला गुटखा सहज मिळतो शासनाने बंदी घातलेली असुन सुद्धा कोणी विक्री करत असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश असतानाही तालुक्यात तो खुलेआम विक्री करत आहे त्याचे हे रॅकेट जळगाव जामोद तालुक्यात पण सक्रिय असून त्यास पाठबळ कुणाचे असा प्रश्न नागरिक विचारत आहे
शाळेच्या आवारात 200 मीटरच्या आत गुटखा सहज मिळतो तसेच शहरातील तसेच तालुक्यातील सर्वच लहान मोठया दुकानात विक्रीस उपलब्ध आहे त्यामुळे शाळकरी मुलांची आरोग्य सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे याकडे विचारणा केली असता आमची वर पर्यन्त फिल्डिंग आहे असे बोलतात संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे असे नागरिकां मध्ये चर्चा आहे यामध्ये अन्न प्रशासन विभाग ,पोलीस यांचे नक्की काय चालले ते दिसून येत आहे काही आर्थिक व्यवहार तर नसतील ना असे नागरिक आपसात चर्चा करत आहे












