तहसीलदार यांच्या हस्ते ई शिधापत्रिकेचा उद्घाटन व वितरण
जळगाव जामोद प्रतिनिधी
तालुक्यात पहिल्यांदाच नवीन ई शिधापत्रिकेचा वितरण आज दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालयात तहसीलदार पवन पाटील यांच्या हस्ते सौ उज्वला संजय उमरकर यांना देऊन उद्घाटन करण्यात आले तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना जुन्या पद्धतीने जे रेशन कार्ड देण्यात येत होते ती लवकरच बंद करून शासनाच्या नवीन नियमानुसार तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना इ शिधापत्रिका म्हणजेच डिजिटल रेशन कार्ड देण्यात येणार आहे सध्या तालुक्यात प्रधान्य कुटुंबाचे २५८७१ रेशन कार्ड धारक , अंत्योदय योजनेचे ५०९९ रेशन कार्ड धारक , शेतकरी योजनेचे ३६३५ रेशन कार्ड धारक व तसेच नवीन रेशन कार्ड ज्यांना धान्य भेटत नाही असे २६३७ रेशन कार्डधारकांना पुढे भविष्यात ई – शिधापत्रिका म्हणजेच डिजिटल रेशन कार्ड मिळणार आहे
तालुक्यातील रेशन कार्डधारकांनी शासनाची RCMS ह्या वेबसाईटवर जाऊन पब्लिक लॉगिन हा पर्याय निवडून रेशन कार्ड संबंधित काही ही काम आता रेशन कार्ड धारक स्वतः करू शकतात ह्या वेबसाईटच्या माध्यमातून रेशन कार्ड स्वतः नवीन रेशन कार्ड बनवणे, रेशन कार्ड मधून नाव कमी करणे किंवा वाढविणे अशा प्रकारचे सर्व कामे रेशन कार्ड घरी बसून मोबाईल वर करू शकतात किंवा सीएससी सेंटर वर जाऊन सुद्धा करू शकतात
तालुक्यातील पहिली इ शिधापत्रिका तहसीलदार पवन पाटील यांच्या हस्ते सौ उज्वला संजय उमरकर व संजय उमरकर यांना देऊन उद्घाटन करण्यात आले ह्या यावेळी तहसीलदार पवन पाटील साहेब, पुरवठा अधिकारी गायकवाड साहेब तसेच पुरवठा निरीक्षक पी व्ही आठवले साहेब उपस्थित होते














