
संपादक मंगेश बहुरूपी :-
जळगांव जामोद
महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर वसलेला हा तालुका आहे. मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा, अग्नि शस्त्रांची तसेच अवैध नकली दारू, गांजा अशा अनेक प्रकारची मोठी वाहतूक या भागातून होत असल्याचे . तालुक्यामधुन होत आहे, या अवैध धंद्यांना सहकार्य स्थानीक वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत असल्याचे नेहमीच नागरिकांच्या चर्चेत असते यामुळेच हा तालुका हा अवैध धंद्यांचा अड्डा बनला असून याकडे स्थानिक पोलिसांची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे. दिनांक २ मार्च रोजी मध्यप्रदेश वरून जळगाव जामोद मार्गे नांदुरा कडे जाणाऱ्या मालवाहू बोलेरो पिक अप वाहन भरधाव वेगाने जात होते. यावेळी या वाहनाचा धक्का रस्त्याने जाणाऱ्या सचिन अवचार नामक एका इसमाला लागल्याने तो जमिनीवर पडला यामुळे नागरिकांनी भरधाव वेगात असलेली बोलेरो पिकअप गाडी मानेगाव जवळ अडविली यामुळे त्या गाडीच्या चालकाची तारांबळ उडाली यामुळे तिथे उपस्थित नागरिकांना शंका आल्याने त्यांनी गाडीमध्ये पाहिले असता त्या नागरिकांना गाडीमध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी ड्रायव्हरला पकडून जळगाव जामोद येथील पोलीस स्टेशन येथे फोन केला यावेळी डायरी अंमलदार ग्यानसिंग राठोड यांनी घटनेची माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिल्याने लगेचच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला पोलीस स्टेशनला आणले. परंतु गुटख्यासह गाडी तशीच असलगाव रस्तावर उभी ठेवण्यात आली होती येथील स्थानिक पत्रकारांनी जाऊन ती गाडी पोलीस ठाण्यात लावण्यास सांगितले त्या वेळी ती गाडी रात्री उशिरा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली
यामध्ये जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचा महाराष्ट्र मध्ये प्रतिबंध असलेला गुटखा विमल, पानबहार, विमल तंबाखू आढळल्याने पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या मालवाहू बोलेरो पिक अप क्रमांक एमएच ४८ एवाय ३४२१ सह प्रतिबंधित गुटखा किंमत अंदाजे २० लाख ४४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी ला पाठीशी घालून बोलेरो वाहनाचे चालक यास आरोपी केले. हे तर असे झाले चोर सोडून संन्याशाला फाशी. असा येथील पोलीस स्टेशनचा कारभार असल्याचे नागरिक बोलत आहेत. तसेच मध्य प्रदेश होऊन येणार हा अवैध गुटखा खामगाव किंवा नांदुरा येथील मोठ्या व्यापाऱ्याचा असल्याचे बोलल्या जात असल्याचे समजते. स्थानिक पोलीस स्टेशन मधील एका कर्मचाऱ्यांशी सुद्धा यात छुपा संबंध असल्याचे पोलीस सूत्रां कडून व नागरिकांच्या चर्चांमधून कळते. या जप्त केलेल्या मालाची विल्हेवाट खरच लावली जाते का की मागच्या दाराने त्याची विक्री केल्या जाते अशी चर्चा सुद्धा नागरिकात ऐकायला मिळत आहे. सदरची कारवाई करतेवेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ, पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, अमोल पंडित, नागेश खाडे, हवालदार पुंडे, उमेश शेगोकार,शिपाई सचिन राजपूत उपस्थित होते. आरोपी मालवाहू बोलेरो पिकअप चालक याच्यावर मानवी आरोग्यासाठी अपायकारक व महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेला गुटखा वाहतूक प्रकरणी अन्नसुरक्षा मानके नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे करीत आहेत. लोक प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे













