जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
भारतीय राज्यघटना निर्मितीला 75 वर्षे पूर्ण झालीत त्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये “संविधान गौरव महोत्सव साजरा केल्या जात आहे आज महाविद्यालयामध्ये या संविधान गौरव महोत्सवाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गिरीश मायी होते तर प्रमुख उपस्थिती डॉ.निलेश निंबाळकर , प्रा.विनोद बावस्कर यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमांमध्ये डॉ निलेश निंबाळकर यांनी संपूर्ण संविधान गौरव महोत्सव उपक्रमांचा आढावा घेत असतानाच सदर विविध उपक्रमांमध्ये क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना महिलादिनी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येतील असे स्पष्ट केले कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनोद बावस्कर यांनी केले प्राचार्य डॉक्टर गिरीश मायी यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली
महाविद्यालयामध्ये संविधान गौरव महोत्सव साजरा करीत असताना शैक्षणिक सत्र 24- 25 अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन राज्यशास्त्र अभ्यास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना या विभागाद्वारे करण्यात आले यामध्ये उद्देश पत्रिका वाचन, मी व माझे संविधान यावर वक्तृत्व, संविधान निर्मितीचा इतिहास या संदर्भात डॉ निलेश निंबाळकर यांचे मार्गदर्शन,’ घरघर संविधान ‘अंतर्गत संविधान उद्देश पत्रिका प्रतींचे वितरण व सेल्फी विथ संविधान, राष्ट्रीय सेवा योजना दत्तक ग्राम सुनगाव येथे संविधान जनजागृती रॅली, ग्रामपंचायत सुनगावला उद्देश पत्रिका फ्लेक्स प्रदान, संविधानाची ओळख या उपक्रमामध्ये डॉ. निलेश निंबाळकर द्वारा संकलित डॉ.शांताराम चव्हाण लिखित भारतीय संविधान ग्रंथातील संविधानातील मानक चित्रांचे प्रदर्शन, भारतीय राज्यघटना निर्मितीचा इतिहास निबंध स्पर्धा, राज्यघटना निर्मिती आभासी प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेळोवेळी प्रा.अर्चना जोशी, प्रा. डॉ,गिरीश कुलकर्णी, प्रा.संतोष कतोरे, प्रा रामेश्वर सायखेडे, समाधान निजले, गजानन वानखडे ,बाबुराव चव्हाण, प्रा.विनोद बावस्कर, मानसी कुलकर्णी, प्रा. सचिन उनडकाट यांचे सहकार्य लाभले














