
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
२ दिवसापूर्वी रात्रीला जळगांव जामोद तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात वादळा सह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे .
या वादळामुळे शेतकऱ्यांचे मका, हायब्रीड ,कांदा व आदी काही पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक फटका बसलेला दिसत आहे.
खरंतर शेतकरी राजा रात्रीचे दिवस करून कबाळ कष्टाने आपली हिरवीगार पिके लहानाचे मोठे करतो आणि अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे क्षणाची ही वाट न पाहता वादळी वाऱ्यामुळे पिके जमीन दोस्त होत असतील तर ही शेतकऱ्याचे दुर्दैवच म्हणावं लागेल.अशा या परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे.
तरी वरील बाब लक्षात घेऊन तात्काळ नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून त्यांना त्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी ही मागणी तहसीलदार जळगाव जामोद यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.
या मागण्याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिला.
यावेळी तुकाराम गटमने, अनिलसिंह राजपुत, वैभव जाणे, अजय गिरी, शिवदास खिरोडकार , सदा जाणे, सोपान पाटील, अनंता मारोडे,त्रिलोकसिंह ठाकुर, अमोल बहादरे,गजानन अढाव, विठ्ठल खंडेराव , श्रीकांत उमाळे ,विजय महाले तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.













