Home बुलढाणा पंचायत समिती जळगाव जामोद मध्ये दिव्यांग निधीवितरण करताना आनंद होत आहे :-...

पंचायत समिती जळगाव जामोद मध्ये दिव्यांग निधीवितरण करताना आनंद होत आहे :- आमदार डॉ संजय कुटे

0
115

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत
जळगाव जा:- दिव्यांग बांधवांसाठी विशेष प्रकल्प राबवणार असून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल ला असेच महामेळावे घेऊन लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचा मांनस असून प्रत्येक दिव्यांग बांधव लाभार्थीस त्याचे हक्काचे 5% निधी चार चार महिन्याने वितरित करावे असे डॉ संजय कुटे यांनी बोलताना सांगितले
सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय 7 कलमी कार्यक्रम सद्या सम्पूर्ण राज्यात अग्रेसर असून त्याचाच भाग म्हणून जीप मुख्य कार्यकारी गुलाबराव खरात साहेब ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी बी एम मोहन साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समिती मधील प्रत्येक योजना लाभार्थी पर्यंत पोचण्यात यावे असे सक्त निर्देश आहे, जळगाव जामोद पंचायत समिती मध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम गटविकास अधिकारी संदीप मोरे यांचे नेतृत्वात राबवणे सुरू आहे, असाच भाग म्हणून दिव्यांग लाभार्थी च पस स्तर च 5% निधी व ग्रामपंचायत स्तर च 5% निधी हा दरवर्षी खर्च करावा लागतो परंतु या वेळी दि 31 मार्च रोजी भव्य असा महासोहळा व तक्रार निवारण दिन पंचायत समिती प्रांगणात दिव्यांग बांधवांना धनादेश आमदार डॉ संजय कुटे त्या त्या ग्रामपचायत चे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला तर पस स्तर वरील पिठाची चक्की लाभ चे 10 लाभार्थी याना zppfms प्रणाली द्वारे डॉ आमदार संजय कुटे यांचे हस्ते एका क्लिक वर रुपये 99000 जमा करण्यात आले, यावेळी 285 दिव्यांग बांधव सर्व ग्रा प चे सरपंच, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले,यावेळी ज्या दिव्यांग बांधवांना चालता येत नव्हते त्यांचे धनादेश स्वतः त्यांच्याजवळ जवळ आमदार व बीडीओ यांनी प्रदान केले यावेळी सर्व दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पहावयास मिळाला

दिव्यांग बांधवांचा निधी वितरण व तक्रार निवारण महासोहल्यासाठी सर्व सरपंच सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांनी अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असून उर्वरित अनुशेष तात्काळ भरून काढण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले असून पंचायत समिती स्तरावर लाभार्थी आणून त्यांना निधी वितरण केल्याबद्दल ग्रामपंचायती व आमदार महोदय यांचे आभार व्यक्त करतो
संदीपकुमार मोरे
गटविकास अधिकारी पस जळगाव जामोद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!