जळगांव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
जळगांव जामोद, संग्रामपुर तालुका हा पर्यावरण दृष्ट्या डोंगर, द-या वृक्ष ,झाडी झुडपे वनस्पती व वनराईने वेढला असुन पर्जन्यवृष्टीचे प्रमाणही अन्य तालुक्या पेक्षा या भागात अधीक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो या अधिक प्रमाणात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेती योग्य पर्जन्यवृष्टी वर पर्यावरणास बाधीत अवैध लाकुड तस्करांची नजर खिळली व काही संबधीताच्या मेहेर नजर मुळे बेधुंद अवैध वृक्ष तोड दीवसा ढवळ्या सुरु पुष्पा राज नजरे आड पुन्हा पुन्हा, नजरेत आले तर ठरतोय गुन्हा एव्हढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्ष तोड होत असतांना वन विभागातील नियुक्त अधिकारी कर्मचारी करतात तरी काय हा मोठा गंभिर प्रश्न नागरिक विचारात आहे शासन वृक्ष संवर्धनासाठी वर्षा काठी लाखो करोडो रुपये खर्ची घालत असुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड संगोपन व संवर्धन या साठी लाखो करोडोची शासनाच्या तिजोरीतील पैशाची उधळपट्टी होत असल्याचे दिसून येत आहे,हीरवीगार वृक्षांनी नटलेली घनदाट जंगले अवैध वृक्ष कटाईने काही दीवसात उजाड होत वाळवंटा सारखे जमिनदोस्त होतांना दीसत आहे
जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील कर्तव्यदक्ष जुजबी अधिकारी प्रकाश जाधव यांनी मात्र अश्या अवैध लाकुड तस्क-यांचा पुष्पा राज मुक्त वन विभाग करण्याचा चंग बांधला असुन दी.५ एप्रील रोजी खचाखच अवैध लाकडांनी भरलेली दोन वाहने ताब्यात घेतली असुन अश्या अवैध वृक्ष तस्करा सह वाहतुक वाहनावर शासन नियमा प्रमाणे पुढील कारवाई सुरु असुन जिल्हा वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करतात या कडे पर्यावरण वृक्ष प्रेमींचे लक्ष लागले आहे