जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव दिनांक ११ ते १४ एप्रिल या दरम्यान विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.
या जयंती महोत्सवाच्या अनुषंगाने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा व उद्देशिका वाचन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
प्रथम र्डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.गिरीश मायी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश निंबाळकर, प्रा.अर्चना जोशी, विनोद बावस्कर, यांची उपस्थिती होती. निबंध स्पर्धेत 26 विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला.
उद्देशिका वाचन
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळा उद्घाटनप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात उद्देशिका वाचन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रश्नमंजुषा व वक्तृत्व स्पर्धा
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपट तसेच कार्य गौरवाच्या अनुषंगाने महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वकृत्व स्पर्धेत सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्रा. ऋषिकेश कांडलकर होते तर परीक्षण प्रा.रामेश्वर सायखेडे व प्रा. गणेश जोशी यांनी परीक्षण केले.संचालन प्रा. सचिन उनडकाट यांनी केले तर प्रफुल्ल घनोकार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन वानखडे ,बाबुराव चव्हाण, समाधान निलजे, प्रा. सचिन उनडकाट ,पर्वत सपकाळ, वैभव घुले प्रफुल्ल धनोकार, राहुल धुंडाळे यांनी परिश्रम घेतले.