कोल्हटकर महाविद्यालयात कौशल्य विकास उपक्रमा अंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन

0
20

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात कौशल्य विकास उपक्रमा अंतर्गत गृह अर्थशास्त् विभागात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे रीतसर उद्घाटन जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल व जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई ,अधीक्षक संजय गाडेकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर ऋषिकेश विप्रदास आणि गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका अर्चना जोशी उपस्थित होत्या या मेळाव्याचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच गृह उद्योगाला चालना मिळणे व भविष्यात मुली स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करू शकतील याकरिता एक दिशा प्राप्त करून देण्यासाठी घेण्यात आला. यामध्ये एकूण 15 स्टॉल लावण्यात आली त्यात मिसळपाव समोसे कचोरी, दहिवडा पाणीपुरी, इडली चटणी मठ्ठा, ढोकळा कांदा भजे ,साबुदाणा वडा ,आलू पोंगे, खस्ता पापड, फ्रुट चाट, गुलाबजाम अशा विविध पदार्थांचा समावेश आनंद मेळाव्यात होता. यामध्ये गृह अर्थशास्त्र विषयांतर्गत शिकविलेल्या पाककलेचा उपयोग करून विद्यार्थिनींनी स्वतः पदार्थ तयार करून त्यांचे उत्तमरीत्या सादरीकरण केले. सर्व पदार्थ अतिशय चविष्ट व रुचकर होते या आनंद मेळाव्यात महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी आनंद मेळाव्यात उपस्थित राहून आस्वाद घेतला या आनंद मेळाव्यात महाविद्यालयातील 300 विद्यार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या मेळाव्याचा आनंद घेतला या मेळाव्यातून निदर्शनास आले की शिक्षक व विद्यार्थी यांच्यातही सहसंबंध चांगले झाले. विचारांची देवाणघेवाण झाली मुलींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला व खरी कमाई काय असते हे शिकायला मिळाले .यातूनच मुलींना गृह उद्योग तसेच इव्हेंट मॅनेजमेंट या उपक्रमाला नवी प्रेरणा मिळाली या कार्यक्रमात जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय अनिल जयस्वाल यांनी मुलींचे कौतुक केले व अतिशय चांगला उपक्रम या महाविद्यालयात राबविल्या गेला याबद्दल शुभेच्छा दिल्या.तसेच जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक सर यांनी सुद्धा मुलींना महाविद्यालयात येणाऱ्या अनेक नवीन उपक्रमाविषयी माहिती दिली व शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयात असेच कार्यक्रम चालू राहो आणि चांगला प्रतिसाद मिळो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन गृह अर्थशास्त्र वीभागाच्या प्राध्यापिका .अर्चना जोशी यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापिका अर्चना जोशी व मानसि कुलकर्णी ,योगेश तायडे व हर्षद धर्मै तसेच गृह अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here