भूमिपुत्रांचे कर्ज माफीसाठी’ भिक मांगो’ आंदोलन!

0
41

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

जिल्ह्यातील संपूर्ण शेतकर्‍यांची पीक कर्जे माफ करू व सातबारा कोरा करू, असे आश्वासन महायुतीच्या जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आम्हा शेतकर्‍यांना दिले होते. संपूर्ण कर्जमाफ करून शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू,असे आश्वासन महायुतीच्या तत्कालीन उमेदवारांनी जाहीरनाम्यातूनही दिले होते. सत्ता स्थापनेनंतर आता शेतकरी त्या आश्वासनाच्या पूर्ततेची आतुरतेने वाट बघत आहेत. शेतमालाच्या बाजार भावात झालेली घसरण, उत्पादनात मोठ्या प्रमाणात झालेली घट, सतत येत असलेले अस्मानी संकट, विविध आर्थिक अडचणींशी करावा लागत असलेला सामना यामुळे हजारो शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. कर्ज थकलेले असल्यामुळे बँकेच्याही अडचणी वाढल्या आहेत. शेतकर्‍यांनी कर्ज भरावे म्हणून बँकांकडून तगादा लावत जात असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेतकर्‍यांचे एकप्रकारे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे.निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते अर्थमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच शेतकर्‍यांना निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द फिरवलेला आहे. खोटे आश्वासन देऊन एकप्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत. तालुक्यातील हजारो शेतकरी २०२३-२४ चा पिक विमा पासून वंचित आहेत शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना करावी. केंद्र शासनाने बियाणे, खते, अवजारे, किटकनाशकांवर जीएसटी लावलेला आहे. शेतकर्‍यांना जीएसटी कर परत मिळावा म्हणून शासनाने काही उपाययोजना केलेली नाही. इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल बनवून कारखानदार, डिलर, दुकानदार जीएसटी परतावा परत मिळवतात. तशी सुविधा शेतकर्‍यांना नाही. त्यामुळे शेतीमालावरील 18% जीएसटी कमी करावा. वरील सर्व मुद्दे घेऊन जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व नागरिक गुरूवार २२ मे २०२५ रोजी उपविभागीय कार्यालयासमोर ‘ भिक मांगो आंदोलन’ करण्यात आले.शेतकऱ्यांकडून व नागरिकांकडून एकूण 1200 रुपये भीक स्वरूपात मिळालेली रक्कम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठवण्यात आली आहे.यावेळी शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे, तुकाराम पाटील, राम वानखडे, विशाल ताकोते पाटील, कार्तिक राऊत,आकाश उमाळे, रामेश्वर काळे, गणेश बोदडे, दीपक आढाव पाटील, अशपाक देशमुख, राम रोठे, सुपडा गावंडे, वासुदेव खोद्रे, गोपाल उमरकर, प्रशांत जाधव, पंकज नाटकूट, अभिषेक हिस्सल, विशाल भालेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here