जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
बाकीच्या अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई कधी?
सर्वच अवैध धंद्यावर कारवाई होणार काय?
जळगाव जामोद: तालुक्यातील भेंडवळ येथील महिलांनी एकत्र येत गावामध्ये अवैध धंदे तसेच अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला होता व गावातील अवैध धंदे यासह दारू विक्री बंदची तक्रार व निवेदन जळगाव पोलीस स्टेशनला महिलांनी मिळून दिले होते. पोलिसांनी निवेदनाची दखल घेउन गावामधील अवैध धंदे बंद केले होते.अशातच पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की भेंडवळ बुद्रुक शेत शिवारातील एका शेतामध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्रीच्या उद्देशाने तयार करत आहे. अशा माहितीवरून पोलीस नाईक इरफान शेख,पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल डब्बे व पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे यांनी घटनास्थळ गाठून रेड केली असता आरोपी रामेश्वर राजाराम जाधव वय ४९ वर्ष यास रंगेहाथ पकडले यावेळी त्याच्या ताब्यातून रामेश्वर राजाराम जाधव यांच्या शेतामध्ये मिळाला माल 1) तिन लोखंडी टिपे प्रतेकी 15 लिटर प्रमाणे ज्यामध्ये 45 लिटर मोह सडवा किमती प्रती लिटर 50 रु प्रमाणे 2250 रु. चा दोन प्लास्टीक कॅन प्रतेकी 15 लिटर प्रमाणे ज्यामध्ये 30 लिटर हा म दारु प्रती लिटर 100 रु दरा प्रमाणे 3000 रु.ची 3) आत 5 लिटरच्या प्लास्टीक कॅन ज्या मध्ये 40 लिटर हा भ दास कि 4000 रु 4) तिन लोखंडी टिपे कि 150 रु 5) दोन 15 लिटर च्या प्लास्टीक कॅन कि 100 रु 6) आठ 5 लिटर च्या प्लास्टीक कॅन कि 160 रु चा असा एकुन 9660/- रु चा माल स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून एकावरती कारवाई केली. भेंडवळ बु शेती शिवारामध्ये अवैध गावठी हातभट्टीची दारू रामेश्वर राजाराम जाधव हे शेतामध्ये गावठी हातभट्टीची व्यवसाय करीत आहे , अशी माहिती जळगाव नपोका पोलीस शेख इरफान यांना माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ आदेशान्वये यांचे पथक गठीत करून भेंडवळ बु गावाला लागून असलेले शेतीमध्ये हातभट्टीची व्यवसाय दाखल झाले. गावातील रामेश्वर राजाराम जाधव हे अवैध गावठी दारू स्वतःच्या शेतामध्ये हातभट्टी लावून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळून आले. त्यामुळे रामेश्वर राजाराम जाधव यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 9660 रुपयाचा पोव्ही माल गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. पण बाकी अवैध धंद्याचे काय ते खरच बंद झालेत का ? असा सवाल नागरिक व महिला विचारात आहे
या एका विरुद्ध कारवाई केली म्हणजे सगळे अवैध धंदे बंद झाले का? तालुक्यातील सगळे धंदे बंद तर होणार नाही ना अवैध धंदे करणाऱ्यात अशी भीती व चर्चा सर्व जनतेत सुरु आहे
जळगाव जामोद पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी शेख इरफान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.














