
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष अमोल येऊल यांच्या राजीनामा यामुळे रिक्त झालेल्या जागेवर दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पदी शालिग्राम गंगाराम भगत यांची अविरोध नियुक्ती करण्यात आली. शालिग्राम भगत यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान असून त्यांनी ग्रामपंचायत सदस्यत्व सुद्धा भुषविले तसेच ते श्री आवजीसिद्ध महाराज संस्थानचे सदस्य सुद्धा आहेत. त्यांनी यापूर्वी ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष पद भुषविले आहे. त्यामुळेच त्यांची महात्मा गांधी गाव तंटामुक्त अध्यक्षपदी गावकऱ्यांनी त्यांची अविरोध निवड केली आहे. सुरुवातीस तीन नावे आली होती परंतु शालिग्राम भगत यांचे नाव त्या ठिकाणी आल्याने इतर दोघांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे शालिग्राम भगत यांची गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच यावेळी सदस्य म्हणून
पत्रकार गजानन सोनटक्के यांचीही निवड करण्यात आली. या ग्रामसभेला सरपंच सचिव अंगणवाडी सेविका पत्रकार माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.













