
जळगाव जामोद (प्रतिनिधी) :-
समर्थ रामदास स्वामी संप्रदायातील सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराजांचे शिष्य श्री श्रीहरी महाराज श्रीक्षेत्र माकोडी तालुका मोताळा यांचा चातुर्मास समाप्ती सोहळा दरवर्षीप्रमाणे दिनांक 24/11/2023 कार्तिक शुद्ध बारसला आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त जळगांव जामोद धुपेश्वर माकोडी पालखी यात्रेचे आयोजन केले असून कार्तिक शुद्ध अष्टमी दिनांक 20/11/2023 सोमवारी सायंकाळी 4 वाजता श्रीराम मंदिर अयोध्या नगर येथील नगरपरिक्रमेला सुरुवात होईल व राजा भर्तरीनाथ महाराजांचे दर्शन घेऊन श्री गजानन महाराज मंदिर जळगांव येथे पालखीचा मुक्काम राहील. नगरपरिक्रमाला महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ व महिला भजनी मंडळाचे विशेष सहकार्य राहणार आहे.
दि.21/11/2023ला मंगळवारी दिंडी प्रस्थान होऊन श्री महासिद्ध महाराज श्रीक्षेत्र धानोरा येथे दर्शन घेऊन, श्री सुपो महाराज पळशी सुपो येथे दर्शन आहे. नंतर श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शन घेऊन अंबिका व भवानी माता मंदिर शिन फाटा येथे पालखीचा मुक्काम आहे.
दि.22/11/2023ला बुधवारी संत बहिरनाथ स्वामी मंदिर भोटा येथे दर्शन घेऊन श्रीधुपेश्वरांचे दर्शन आहे व विठ्ठल रुक्मिणी मंदिर पान्हेरा येथे पालखी मुक्काम राहील. दि.23/11/2023 ला गुरुवारी गजानन महाराज मंदिर घिर्णी बेलाड येथे दर्शन घेऊन सातबलेश्वर शिव मंदिर दाताळा येथे पालखी पोहोचेल, श्री चैतन्य राम मंदिर माकोडी येथे पालखी चा मुक्काम राहील.
दि.24/11/2023 ला शुक्रवारी होम हवन श्रीहरी महाराज दर्शन प्रवचन भजन कीर्तन हरीहट कार्यक्रमात भाविक सहभागी होतील. त्याच दिवशी पालखी वाहनाने जळगांवला परत येईल सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या भाविक बंधू भगिनींनी श्रीराम उपासना मंडळाचे
श्री भगवान भाऊ अतकरे मो. क्र.7767945497,
सुरेश गोंड,9766757571,
पांडुरंग म्हस्के 9763048256,
प्रमोद मिरगे 9834609049,
निलेश काचकुरे, मंगेश बावसकर,दशरथ बोंबातकर, अंकित रोहनकर, ओम गोंड, संतोष कुकडे,महादेव टाकळकर,प्रवीण बार पाटील, विष्णू कवडकर, निवृत्त्ती कळमकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या शहरातील/तालुक्यातील ताज्या बातम्या व घडामोडी वाचण्याकरिता खाली दिलेल्या लिंक टाईप करून ग्रुप ला जॉईन व्हा.
1)जळगांव जामोद
https://chat.whatsapp.com/Jdvk9wK6Bun2JFW2yIoirz
2)खामगांव
https://chat.whatsapp.com/Ex9r04DvB50BxLrqKn5DVL
3) संग्रामपूर
https://chat.whatsapp.com/L5xlE8C3NIW1q5Bw153dSc













