निमा संघटना जळगाव जामोद तर्फे धन्वंतरी जयंती साजरी
जळगाव जामोद:-प्रतिनिधी
:- National Integrated Medical Association, शाखा जळगाव जामोद च्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दि.10 नोव्हेंबर 2023 रोजी भगवान धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री धन्वंतरी पूजन व आरतीने करण्यात आली. तसेच गत अनेक वर्षांपासून जळगाव आणि परिसरात वैद्यकीय सेवा देणारे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश नेवे यांना या वर्षीचा “धन्वंतरी पुरस्कार 2023” देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यामध्ये डॉ. नेवे यांना सहकुटुंब आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. नेवे यांनी ईतर डॉक्टर मंडळींना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आपल्या प्रदीर्घ काळापासून करत असलेल्या सेवेतील अनुभव कथन केले.
सदर कार्यक्रम हा निमा अध्यक्ष डॉ. सतिश प्रल्हाद शिरेकार, (बालरोग तज्ञ) यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन पूर्वक पार पडला.
. तसेच या ठिकाणीसदर कार्यक्रमला डॉ अनिल कुळकर्णी,यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच निमा जळगाव जा तालुका शाखा अध्यक्ष डॉ. सतिश प्रल्हाद शिरेकार, उपाध्यक्ष डॉ. आदित्य जाधव, डॉ. तनवीर, सचिव डॉ. मंगेश बडेरे, सहसचिव डॉ. सचिन काळपांडे आणि डॉ. सागर टावरी , आयोजक डॉ. अतुल उमाळे आणि डॉ. अतुल खर्चे, राज्य प्रतिनिधी डॉ. प्रवीण कपले, डॉ. संतोष शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. वैभव खिरोडकार, सोशल मीडिया प्रमुख डॉ. श्रीकांत अढाव , निमा women’s forum अध्यक्ष डॉ. सौ. मंगला काळपांडे, सचिव डॉ. सौ. वैशाली उमरकर, सल्लागार मंडळातील डॉ. अतुल गट्टानी, डॉ. पी. आर. उमरकर, डॉ. अनुप शर्मा, डॉ. दिलीप डाबरे, तसेच डॉ. सौ किरण अक्षय ढोकणे, डॉ सौ रश्मी खिरोडकार, डॉ.आशा सतिश शिरेकार, डॉ.अतुल अंबडकार,डॉ.पवन सुरपाटने , डॉ.आदित्य ढोकणे डॉ.तन्वीर ,डॉ शंकर मिसाळ,डॉ गोविंद वानखेडे व सौ.वानखडे, डॉ मो.शकील तसेच निमा संघटनेतील ईतर सर्व डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते
डॉ मंगेश बडेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमा कोषाध्यक्ष डॉ. वैभव खिरोडकार (स्त्री रोग तज्ञ) यांनी केले
आणि
डॉ. श्रीकांत अढाव
यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाल्याचे घोषित केले.














