
*भगवान बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती मोठया उल्हासात ग्रा. भिंगारा येथे साजरा
कालआदिवासी चे दैवत, धरती पुत्र बिरसा मुंडा यांची जयंती भिंगारा येथे ग्रामपंचायत चे सरपंच श्री. राजेश मो. अवासे यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आले होते.
भिंगारा येथील राणी महल चौक मध्ये भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरा करण्यात आली.
*सरपंच राजेश मो. अवासे** :-यांच्या सूचक कल्पनेतुन गावातील जेष्ठ युक्तीचा सत्कार सोहळा आयोजित केला होता या सत्कार सोहळा मध्ये गावातील जेष्ठ युक्तीना साल, श्रीफळ व फुल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले गावातील जेष्ठ युक्ती हीच आदिवासी ची खरी ओळख आहे प्राचीन काळी घडलेल्या घटना ह्या त्यांच्या दंतकथा, कहाण्या व त्यांच्या कथा मधून आपल्या कानी पडतात व त्या इतिहास स्वरूपात माहिती संकलन करण्यात मदत होते तसेच त्यांचा परिधान सुद्धा आदिवासी ची ओळख आहे, काळानुरूप आदिवासी ची संस्कृती नष्ट होत चालली ती टिकवण्यास मदत होते.
*प्रशांत सोनोने*(बुलडाणा )संस्थाक मूलनिवासी मुक्ती मोर्चा:- यांनी धरती आबा बिरसा मुंडाच्या क्रांतिकारी जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले कि समाजातील शेवटचा माणूस शोषण मुक्त व भयामुक्त जगावा यासाठी बिरसाचे उलगुलान, आंदोलन होते. उलगुलान म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक संपूर्ण क्रांती. जोपर्यंत शोषनाचा अंत होणार नाही तोपर्यंत अविरत संघर्ष चालूच राहणार. सृष्टी उत्पत्ती पासूनच आदिवासी जल जंगल जमीनचे मूळ मालक असून, घटने च्या 25कलमानुसार आदिवासी हिंदू नाहीत, परंतु मनुवादी व्यवस्था डांग येथे शबरी कुंभ, तशेच कुंभ मेळ्यात आदिवासीना जबरदस्ती नेऊन त्यांना गुलाम बनविण्यासाठी त्यांच्या मेंडूवर हिंदुत्वाचे कलम करत आहे. आदिवासीनी अन्याय अत्याचार रोकण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याचे आव्हान त्यांनी केले.
*शुभम वाकोडे**सामाजिक कार्यकर्ता (नांदुरा ):-यांनी आदिवासी युवकांना व्यसनापासून मुक्त हवे, बाबासाहेबांनी दिलेल्या घटनाच्या आधारे शिका व समाजाला सुद्धा शिक्षित करून पुढे न्यावे असे आव्हान त्यांनी केले.
या कार्य क्रमासाठी तिन्ही गावातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते, बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त गावातील सर्व युवक समाजासाठी, गावासाठी संघटित होऊन लढण्याचे संकल्प घेतले.गावात भगवान बिरसा मुंडा यांची मिरवणूक काढून एकात्मतेचा संदेश देण्यात आला
ग्रामपंचायत चे सरपंच राजेश मो. अवासे, ग्रा.सदस्य-नंदु तडवले, सुरेश डावर, देवसिंग मसाने गावातील युवा तरुण रामलाल मोरे, राधेश्याम खरात, देविदास डावर, अनिल ससत्या (चारबन )सुनील तडवले, इंदरसीग तडवले, केदार मसाने,सुनील मसाने, सखाराम मसाने, सुनील मुझलदा अनेक तरुणी उपस्थित होते.
*सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन* :-सरदार ज. अवासे यांनी केले













