
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगांव जामोद जिल्हा बुलढाणा यांच्या माध्यमातून बारी समाजाच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे, श्री संत रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारकाच्या कामास गती देण्यात यावी, पानवेली/पानपिप्री व मुसली या पिकांना औषधी चा दर्जा देण्यात यावा तसेच संशोधन केंद्र व बाजारपेठ व अनुदान देण्यात यावे.
ओबिसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे, समाजातील विद्यार्थ्यासाठी महत्वाच्या शहरात वसतिगृहे उभारण्यात यावी या व ईतर विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी संबंधित मंत्रालयात बारी समाजाची बैठक बोलावून मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात अश्या आशयाचे निवेदन सकल बारी समाजाच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनाच्या प्रतीलिपी मा. उपमुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते,बुलढाणा जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार व आमदार यांना देण्यात येतील.
याप्रसंगी ,श्याम डाबरे, सुभाष हागे,तुकाराम काळपांडे, अर्जुन घोलप, रमेश ताडे, अशोक काळपांडे, गुणवंत कपले, डॉ गणेश दातिर,कैलास डोबे, सखाराम ताडे,रमेश बानाईत,रमेश कोथळकर, बळीराम धुळे, महादेव धुर्डे , रुपेश येऊल,श्रीकृष्ण केदार, प्रवीण अस्वार, सुनील बोडखे ,संतोष काळपांडे, नारायण कोथळकर,संतोष डब्बे,अजय वंडाळे,गौरव डोबे, हरिदास धूर्डे ,शालिग्राम मिसाळ, पांडुरंग म्हस्के, विश्वनाथ बोडखे, शंकर म्हस्के,सिताराम अंबडकार ,डॉ पांडुरंग ढगे,शंकरराव ताडे,गोपाल कोथळकर, पांडुरंग ढगे, नंदकिशोर रेखाते,पवन अस्वार, वैभव डाबरे व जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.













