Home बुलढाणा विविध मागण्यांसाठी स्व.धा.दु.संघटनेचे धरने आंदोलन

विविध मागण्यांसाठी स्व.धा.दु.संघटनेचे धरने आंदोलन

0
125

 

जळगांव जामोद (प्रतिनिधी):-

विविध मागण्यासाठी जळगांव जामोद तालुका स्वस्त धान्य दुकानदार  संघटनेच्या वतीने १ जानेवारी 2024 रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

एक जानेवारी 2024 पासून संपूर्ण स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात स्वस्त धान्य दुकानदार एक दिवसीय आंदोलन करत आहे.

या आंदोलनामध्ये मुख्य मागण्या कालबाह्य झालेल्या ई-पॉस मशीन बदलून ५ जी मशीन देण्यात याव्या, स्वस्त धान्य दुकानदारांना 50 हजार रुपये महिना किंवा १५० ऐवजी ३०० रुपये कमिशन देण्यात यावे तसेच आनंदाचा शिधा हा कायमस्वरूपी चालू ठेवावे त्यामध्ये कांदा चणाडाळ तुरडाळ इत्यादी वस्तूंचा समावेश करण्यात यावा.

स्वस्त धान्य दुकानदारांना सीएससी सेंटर व सेतू केंद्र देण्यात यावे व तसेच अन्नसुरक्षा चा इष्टांक सुद्धा वाढवून देण्यात यावे या सर्व मागण्यांकरिता जळगाव जामोद स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर दाताळकर, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रंगराव देशमुख, गजानन भाऊ वाघ, संजय देशमुख,अरुण साबळे, शालिग्राम दाते, अरुण पारवे, देशमुख बापू,हरिदास इंगळे, वैभव जोजार, गजानन बाठे,रामकृष्ण तायडे, तालुक्यातील बहुसंख्य दुकानदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!