
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर मार्गदर्शन करण्याकरिता महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक प्रकाश गवई हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रवीण डाबरे तसेच इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.कुळकर्णी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक चव्हाण यांनी केले या कार्यक्रमानंतर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचलन कुमारी आम्रपाली वानखेडे हिने केले. स्पर्धा व निबंध स्पर्धा या दोन्ही स्पर्धांकरिता “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य’ हा विषय देण्यात आला होता.
या स्पर्धेमध्ये एकूण 13 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक चव्हाण महिला कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका भोपळे, निर्भय इंगळे वैभव घुले व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.













